रोहित शर्माच्या बालमित्रांनी केल अनोख्या पद्धतीन स्वागत ,पाहा व्हिडिओ

0
82

टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघ चार दिवसानंतर मायभूमीत दाखल झाला. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर टीम इंडिया मुंबईत दाखल झाली. मुंबईत नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान भारतीय क्रिकेट संघाची विजयी परेड काढण्यात आली. या विजयी परेडचे साक्षीदार होण्यासाठी लाखो मुंबईकर मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे स्टेडियमवर जमले होते. या परेडनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) घरी पोहोचला, तिथं त्याच्या मित्रांनी जंगी स्वागत केलं.

नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान मरीन ड्राईव्हवर लाखोंच्या संख्येनं मुंबईकर जमा झाले होते. यांच्यामधून वाट काढत टीम इंडियाची बस वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाली. वानखेडे स्टेडियमवर सत्कार सोहळा पार पडला. या सत्कार सोहळ्यानंतर रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांची भाषणं झाली. या सोहळ्याला बीसीसीआयकडून चेअरमन रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, खजीनदार आशिष शेलार आणि राजीव शुक्ला उपस्थित होते. या सोहळ्यानंतर रोहित शर्मा मुंबईतील प्रभादेवी येथील निवासस्थानी दाखल झाला. यावेळी रोहित शर्माचं त्याच्या बालपणीच्या मित्रांनी त्याचं अनोखं स्वागत केलं.

रोहित शर्माच्या मित्रांनी तो घरी पोहोचताच अनोखं स्वागत केलं. रोहित शर्माचे कुटुंबीय, त्याचे बालपणीचे मित्र आणि मुंबई इंडियन्समधील सहकारी तिलक वर्मा उपस्थित होते. रोहित शर्मा असं नाव लिहिलेले फोटो आणि टीशर्ट रोहितच्या मित्रांनी घातले होते. रोहितच्या स्वागतासाठी त्यांनी डान्स केला. यानंतर त्यांनी हिटमॅनला खांद्यावर उचलून घेत वर्ल्ड कप विजयाचं स्वागत केलं.

रोहित शर्माचा आज विधिमंडळात सत्कार :

महाराष्ट्राच्या विधिमंडळाकडून मुंबईकर खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा आज सत्कार महाराष्ट्राच्या विधिमंडळाकडून केला जाणार आहे. तर, महाराष्ट्र सरकारकडून या चार खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये दिले जाणार आहेत.

दरम्यान, रोहित शर्मा टी 20 वर्ल्ड कपच्या 2007 आणि 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असणारा एकमेव खेळाडू आहे. भारतानं 17 वर्षानंतर विजेतेपद पटकावलं. या विजयाचा आनंद देशभर साजरा करण्यात आला.

पाहा व्हिडिओ: