रील्स नव्हे तर मित्रानेच केला मर्डर प्लान ;बहिणीचा आरोप

0
9

छत्रपती संभाजी नगर मध्ये 3 दिवसांपूर्वी दरीत गाडी कोसळून मुलीचा मृत्यू झाल्यानंतर आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. हा अपघात रिल्स आणि व्हिडिओ काढण्याच्या नादात झाल्याचा प्राथमिक अंदाज होता पण हा ठरवून घडवलेला मर्डर (Murder) असल्याचा दावा मृत मुलीच्या चुलत बहिणीने केला आहे. अपघातानंतर 3 दिवसांनी ही बाब समोर आल्याचं पोलिसांनी म्हटलं असे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तामध्ये सांगण्यात आले आहे.

मृत मुलीची चुलत बहिण प्रियंका यादव ने हा प्लॅन्ड मर्डर असल्याचं सांगत ‘अपघातानंतर सुमारे 5-6 तासांनी आम्हांला त्याची माहिती मिळाल्याचं’ म्हटलं आहे. ‘श्वेता (अपघातामधील मृत मुलगी) कधीही रिल्स बनवत नव्हती, सोशल मीडीयावर कधी पोस्ट केले नाही’ असं म्हटलं आहे. तिच्यामते हा प्लॅन केलेला मर्डर असून त्याने तिला 30-40 किमी शहरापासून दूर नेले.

सध्या श्वेता सोबत असलेल्या तिच्या मित्रावर Indian Penal Code section 304 (A) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्याने मुलीकडे गाडी चालवण्याचा परवाना आहे की नाही हे पाहता तिला गाडीची चावी दिल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

श्यावेता सुरवसे  23 वर्षीय मुलीचा 3 दिवसांपूर्वी गाडी रिव्हर्स मध्ये चालवताना अॅिक्सिलेटर दाबला गेल्याने मृत्यू झाला आहे. तिचा मित्र सूरज मुळे तिचा व्हिडिओ बनवत होता. सुलिभाजन भागामध्ये गाडी मागे जाऊन क्रॅश बॅरिअर तोडून गाडी दरीत पडली. तासाभराने तिला बाहेर काढण्यात आले मात्र यामध्ये तिचा मृत्यू झाला होता. नजिकच्या रूग्णालयात तिला मृताव्यस्थेमध्ये आणण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी नियमानुसार आरोपीला नोटीस बजावली जाईल असेही पोलिसांनी सांगितले आहे. श्वेताच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये तुफान वायरल झाला आहे.

व्हिडीओ: