अंघोळ करताना अचानक धबधब्याला पूर आल्याने 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू ; पहा व्हिडीओ

0
6

तामिळनाडू येथील टेंकासी जिल्ह्यातील पश्चिम घाट भागात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यात अतिवृष्टीमुळे जुना कोर्टल्लम धबधब्याला अचानक पूर आला. धबधब्यात अंघोळ करणाऱ्या सर्व पर्यटकांनी तेथून पळ काढला. धक्कादायक म्हणजे कुटुंबासह अंघोळ करणाऱ्या 17 वर्षीय मुलगा अचानक पुरात अडकून वाहून गेला. या घटनेनंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी पोलिस आणि प्रशासन दाखल झाले. घटनास्थळी बचाव कार्य सुरु झाले. या पुरात अडकलेल्या 5 जणांपैकी 4 जणांना तेथील लोकांनी सुदैवाने वाचवले. अचानक पूर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पूराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जुन्या कोर्टलम धबधब्यात अंघोळ करतान अचानक आलेल्या पूरात एक १७ वर्षीय मुलगा पूरात वाहून गेला. अश्विन असं मुलाचे नाव होते. बचावकार्याच्या मदतीने अथक प्रयत्नानंतर अश्विनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
यानंतर जिल्हाधिकारी कमल किशोर आणि एस, बी. सुरेश कुमार यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. जिल्ह्यातील ऐंदारुवी आणि मुख्य धबधब्यांसह धबधब्यांमध्ये अचानक पूर आल्याने जुने कोर्टलम, मुख्य धबधबा आणि आइंदारुवी धबधब्यांमध्ये आंघोळ करण्यास येणाऱ्या पर्यटकांसह सर्वांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

पहा व्हिडीओ :