उद्धव ठाकरेंचा अचानक मोठा निर्णय! एका जागेवरील उमेदवार घेतला मागे

0
1

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कुरबुरी होताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांविरुद्ध उभी ठाकल्याचे स्थिती निर्माण झाली होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी एका जागेवरून उमेदवार मागे घेतला आहे, तर काँग्रेसनेही एका मतदारसंघातून माघार घेतल्याने महाविकास आघाडीतील जागांबद्दलचा कलह शमल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. 26 जून रोजी मतदान होत असून, आज (12 जून) उमेदवार अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेने चारही मतदारसंघातून उमेदवार दिले. तर काँग्रेसने कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवार दिले होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार
कोकण पदवीधर मतदारसंघ
निरंजन डावखरे (भाजप)
किशोर जैन (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
रमेश कीर (काँग्रेस)
संजय मोरे (शिवसेना)
अमित सरैय्या (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)