‘ही’ आहेत मोदींच्या मंत्रिमंडळात पदे मिळणाऱ्या संभाव्य मंत्र्यांची नावे

0
9

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आजच्या सोहळ्यात 30 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मंत्रिमंडळात काही नवे चेहरे असू शकतात. कारण भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. अशा स्थितीत महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. आज मित्रपक्षांच्या संभाव्य मंत्र्यांनाही फोन येऊ लागले आहेत. संभाव्य नावांमध्ये – जयंत चौधरी, अनुप्रिया पटेल, राजनाथ सिंह, पीयूष गोयल, गडकरी जीतन राम मांझी, टीडीपीकडून चंद्रशेखर पेम्मासानी, टीडीपीकडून के मोहन राम नायडू, जेडीयूचे राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर, जेडीएसचे एचडी कुमार स्वामी आणि चिरागही यांचा समावेश आहे.

TDP चे 2 खासदार मोदी मंत्रिमंडळात सामील होणार –

चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील टीडीपीने रविवारी पुष्टी केली की, त्यांचे दोन नवनिर्वाचित खासदार भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग बनणार आहेत. टीडीपीचे माजी खासदार जयदेव गल्ला यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नवनिर्वाचित खासदार राम मोहन नायडू किंजरापू आणि चंद्रशेखर पेम्मासानी यांना नवीन एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्त केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार संभाव्य मंत्री –

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्नाटक राज्यातील तीन नेते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तिघांपैकी एक कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि JD(S) नेते एचडी कुमारस्वामी आहेत. अन्य दोन नेत्यांची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत.
JU(U) खासदार –

वृत्तानुसार, लालन सिंह, संजय कुमार झा, रामनाथ ठाकूर, सुनील कुमार आणि कौशलेंद्र कुमार यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
एनडीएचे इतर नेते –

मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा असलेल्या इतर आघाडीच्या नेत्यांमध्ये चिराग पासवान, अनुप्रिया पटेल (अपना दल पक्षाचे प्रमुख), जयंत चौधरी (राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख) आणि जितन राम मांझी (हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे प्रमुख) यांचा समावेश आहे.

याशिवाय भाजपच्या नेत्यांमध्ये राजनाथ सिंह, शिवराज सिंह चौहान, नितीन गडकरी, अमित शाह, डीके अरुणा, डी अरविंद, बसवराज बोम्मई, बिप्लब देव, सुरेश गोपी, पीयूष गोयल, प्रतापराव जाधव, संजय जैस्वाल, प्रल्हाद जोशी, गोविंद करजोल, पीसी मोहन, बिजुली कलिता मेधी, धर्मेंद्र प्रधान, जितिन प्रसाद, दग्गुबती पुरंदेश्वरी, नित्यानंद राय, एटाला राजेंद्र, किशन रेड्डी, किरेन रिजिजू, राजीव प्रताप रुडी, मनमोहन सामल, बंदी संजय, ज्योतिरादित्य सिंधिया, जुगल किशोर सिंह दुष्यंत शर्मा, जुगलकिशोर गवा, सिंग, जितेंद्र सिंग, सर्बानंद सोनोवाल आणि शंतनू ठाकूर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

शपथविधी सोहळ्यापूर्वी नरेंद्र मोदी नवीन मंत्रिमंडळाच्या सदस्यांसोबत त्यांच्या निवासस्थानी, 7 लोककल्याण मार्गावर बैठक घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात या सोहळ्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. 5 वाजल्यापासून राष्ट्रपती भवनात पाहुण्यांचे आगमन सुरू होईल. त्यानंतर 7:15 वाजता शपथविधी सोहळ्याल सुरुवात होणार आहे.