महाविकास आघाडीला धक्का ; “या” महानगरपालिकेत उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने, भाजपचे 8 उमेदवार बिनविरोध

0
43

माणदेश एक्सप्रेस न्यूज / पनवेल :  राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टी (भाजप) ने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. कल्याण-डोंबिवलीनंतर ठाणे, भिवंडी, अहिल्यानगरमध्ये बिनविरोध यश मिळवल्यानंतर आता पनवेल महानगरपालिकेतही भाजपने मोठी बाजी मारली आहे. पनवेल महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल 7 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने भाजपचे एकूण 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे मतदानापूर्वीच महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

पनवेल महापालिकेतील प्रभाग क्रमांक 18 (ब) मधून भाजपचे नितीन पाटील हे सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले. येथील शेतकरी कामगार पक्ष च्या उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्यामुळे नितीन पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. परिणामी पनवेल महापालिकेसाठी मतदान होण्यापूर्वीच भाजपचा पहिला विजय नोंदवला गेला.

यानंतर आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने भाजप व महायुतीचा मार्ग अधिकच मोकळा झाला. यामुळे पनवेल महापालिकेत महायुतीचे 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे –

  1. नितीन पाटील

  2. रुचिता लोंढे

  3. अजय बहिरा

  4. दर्शना भोईर

  5. प्रियंका कांडपिळे

  6. ममता प्रितम म्हात्रे

  7. स्नेहल ढमाले

पनवेल महापालिकेतील या घडामोडींमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीला उमेदवार माघारीमुळे मोठा फटका बसला असून याचे पडसाद येत्या राजकारणात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here