
माणदेश एक्सप्रेस न्यूज : आटपाडी : तालुक्यातील विविध गावांमधील धार्मिक स्थळे, शाळा परिसर तसेच ग्रामपंचायत मालकीच्या जागांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या विशेष प्रयत्नातून आटपाडी तालुक्यासाठी हे विकासकामांचे पॅकेज मंजूर झाले असून यामुळे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांना चालना मिळणार आहे.
सभामंडप बांधणी
1. निंबवडे – ताई आई मंदिरासमोर सभामंडप बांधणे – ७ लाख
2. विभूतवाडी (गुळेवाडी) – विठोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे – ६ लाख
3. विभूतवाडी – रामोशी समाज खंडोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे – ७ लाख
4. माडगुळे – गावभाग खंडोबा मंदिर, रामोशी समाज खुल्या जागेत सभामंडप बांधणे – १० लाख
5. आंबेवाडी – कैकाडी वस्ती येथे सभामंडप बांधणे – १० लाख
________________________________________
पेव्हिंग ब्लॉक बसवणे
1. दिघंची ढोलेमळा – सिद्धनाथ मंदिरासमोर – ५ लाख
2. गळवेवाडी – जि.प. शाळेसमोर खुल्या जागेत – ५ लाख
3. राजेवाडी – ग्रामपंचायत मालकीच्या खुल्या जागेत – ५ लाख
4. मुढेवाडी – जि.प. शाळेसमोर – ५ लाख
5. पारेकरवाडी – खंडोबा मंदिरासमोर – ५ लाख
6. कामथ – जि.प. शाळेसमोर – ५ लाख
7. नेलकरंजी (मेटकरवाडी, सटवाई मळा) – बिरोबा मंदिरासमोर – ५ लाख
8. मानेवाडी – बाळूमामा मंदिरासमोर – ५ लाख
9. गोमेवाडी – जि.प. शाळेसमोर – ५ लाख
10. बालेवाडी – खिलोबा मंदिरासमोर – ५ लाख
11. काळेवाडी – जि.प. शाळा परिसरात – ५ लाख
12. बनपुरी – म्हसोबा मंदिरासमोर – ५ लाख
13. मिटकी – गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक – ५ लाख
14. तळेवाडी – गोयाबा मंदिरासमोर – ४ लाख
15. मासाळवाडी – बिरोबा मंदिरासमोर – ५ लाख
16. लेंगरेवाडी – वीर काळंबा मंदिरासमोर – ५ लाख
17. लेंगरेवाडी – जि.प. शाळा परिसरात – ५ लाख
18. माडगुळे – मारुती मंदिरासमोर – ५ लाख
________________________________________
रस्ता काँक्रिटीकरण
1. खरसुंडी – अरुण जाधव ते नारायण तरंगे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण – ७ लाख
2. चिंचाळे – चोपडी वस्ती येथे अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण – ५ लाख
________________________________________
इतर सोयी सुविधा
1. घरनिकी — बेस्गळवाडी येथील मंदिरासमोर सोयी सुविधा पुरवणे – ३ लाख
या सर्व कामांमुळे तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणांचा विकास, नागरिकांसाठी सोयी-सुविधा तसेच ग्रामीण सौंदर्यीकरणाला चालना मिळणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. आमदार गोपीचंद पडळकर व ब्रम्हानंद पडळकर यांच्या प्रयत्नामुळे आटपाडी तालुक्याचा सर्वांगीण विकास वेगाने होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


