
माणदेश एक्सप्रेस न्यूज | चंदीगड–जयपूर
दररोज गल्लीत बटाटे-टोमॅटो विकून घर चालवणाऱ्या गरीब विक्रेत्याचे आयुष्य एका क्षणात बदलले. पंजाब सरकारच्या दिवाळी बंपर लॉटरीमध्ये राजस्थानच्या जयपूर येथील अमित या परिश्रमी तरुणाला तब्बल 11 कोटींचा पहिला क्रमांकाचा बumper prize मिळाला आहे. हातात तिकीट होते, नशीब त्याच्या दारात उभं होतं, पण एक छोटी अडचण – मोबाईल बंद! सरकारकडून वारंवार फोन जाऊनही संपर्क होत नव्हता. अखेर प्रशासनाने शोध घेऊन ही आनंदाची बातमी अमितपर्यंत पोहोचवली आणि त्याचं जगच बदललं.
अमित जयपूरमध्ये एका गल्लीत बटाटे-टोमॅटो विक्रीचा साधा स्टॉल लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. दैनंदिन कष्ट, संघर्ष, पोलिसांचे अपशब्द आणि उपजीविकेची धडपड… अशात एका क्षणात त्याच्या नशिबाने कलाटणी घेतली.
“विश्वास बसत नाहीय… मी उड्या मारून आनंद साजरा करावा का रडावं?” – पंजाब स्टेट लॉटरीजच्या कार्यालयात चक्क डोळ्यात पाणी येत अमितने सांगितले.
अमित म्हणतो,
“20 वर्षांपासून मी लॉटरीचं तिकीट घेतोय. पोलीस कधी-कधी स्टॉल लावू देत नसत. अपमान सहन करावा लागायचा. पण आज हनुमानजींच्या कृपेने माझं नशीब फुललं.”
लॉटरी निघाल्यानंतर प्रशासनाने अमितच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी अमितचा फोन बिघडला होता. नंबर सतत बंद लागत होता. अखेर तिकीट विक्री ठिकाणातून त्याचा शोध घेण्यात आला आणि ही बातमी त्याच्यापर्यंत पोहोचली.
अमितने सांगीतले,
“इथं यायलाही माझ्याकडे पैसे नव्हते. तिकीटाचाही पैसा मी उधार घेतला होता. आज मात्र माझं नशीब पूर्णपणे बदललं.”
मुलांच्या भविष्यासंदर्भात बोलताना त्याचा आवाज दाटून आला,
“माझा मुलगा म्हणायचा – ‘पप्पा मी आयएएस ऑफिसर बनणार!’ आता मी माझ्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देणार.”
अमित, पत्नी व दोन मुलांसह चंदीगड येथील पंजाब स्टेट लॉटरीज कार्यालयात पोहोचला आहे. सरकारकडून 11 चेक देण्यात येणार असून टॅक्स कापून रक्कम दिली जाईल.
लॉटरीची माहिती
लॉटरी नाव: पंजाब स्टेट डियर दिवाली बंपर 2025
पहिले बक्षीस: ₹11 कोटी
एकूण पुरस्कार निधी: ₹36.14 कोटी
एकूण तिकीटं छापली: 24 लाख (A, B, C सिरीज)
विकली गेलेली तिकीटं: 18.84 लाख
अमितचे तिकीट नंबर: A-438586 (भतिंडा येथे खरेदी)
लॉटरी लागल्यानंतर 30 दिवसांच्या आत क्लेम करावा लागतो. उशीर केल्यास बक्षीस मिळणार नाही, अशी नियमावली आहे.
अमितच्या या नशिबाने केवळ त्याचं घर नव्हे तर मेहनती सर्वसामान्यांना प्रेरणा दिली आहे. रोजगारासाठी घाम गाळणाऱ्या कामगार-विक्रेत्यांसाठी ही घटना आशेचा किरण ठरली आहे.
गरीबी, संघर्ष, आणि नशीब – एक वास्तव कथा.
सध्या सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
“मेहनत आणि श्रद्धा कधीच वाया जात नाही” असा प्रतिसाद उमटतो आहे.
गल्लीत बटाटे-टोमॅटो विकणारा विक्रेता आज करोडपती झाला…
हेच तर नशीब!


