
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मराठवाडा प्रतिनिधी
महाराष्ट्रात विधानसभा, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान टीका केली आहे. कर्जमाफीच्या विषयावरून त्यांनी सरकारला चपराक लगावत “पूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे” अशी ठाम मागणी केली.
उद्धव ठाकरे यांनी भाषणादरम्यान अलीकडील चर्चेत असलेल्या फडणवीसांच्या “खुर्ची प्रसंगाचा” उल्लेख करत त्यांची खिल्ली उडवली. बिहारमध्ये निवडणुकांदरम्यान स्टेजवरील खुर्चीवर बसताना फडणवीस पडता पडता वाचले होते. यावर टीका करत उद्धव म्हणाले,
“मुख्यमंत्री बिहारला गेले, बसता बसता पडले, पडता पडता बसले… पंचांग काढून बसले आहेत.”
उद्धव ठाकरेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या भाषणात त्यांचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी युतीवरही पलटवार करत म्हटले,
“संविधानात उपमुख्यमंत्रिपदच नाही… मग हे कोणते पद आहे?”
आणि सरकारच्या पॅकेजवरही त्यांनी सवाल उपस्थित केला,
“सरकारचे पॅकेज आम्हाला मान्य नाही. मी कर्जमाफी केली तेव्हा परदेशी समित्या पाठवल्या नाहीत.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कर्जमुक्ती संदर्भातील वक्तव्यावर जोरदार प्रहार करत उद्धव म्हणाले,
“आता केली तर बँकांचा फायदा होईल म्हणतात, जूनमध्ये केली तर बँकांचा फायदा होणार नाही? मग कसं? स्पष्ट सांगा!”
त्यांनी पुढे जोडले,
“मी अभ्यास न करता दोन लाख कर्जमुक्ती केली… मला ढ म्हणा तरी चालेल, पण अभ्यास न करता शेतकऱ्याचं भलं केलं.”
उद्धव ठाकरेंनी हवामान संकटावरही सरकारला सवाल केला.
“पावसात सगळं सडून गेलं… पुराचे लोंढे येतायत. अशात शेतकऱ्याला हमीभाव आहे का?”
तसेच त्यांनी शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत म्हटलं,
“मागे एक चळवळ चालू होती, पण त्यांना कोपराला गूळ लावला. निवडणुकीच्या आधी कर्जमाफीचं आमिष दाखवतायत. जिल्हापरिषद निवडणुकीच्या आधी कर्जमुक्ती झालीशिवाय मत मिळणार नाही असं सांगा!”
राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना, दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपानं रंगतदार वळण घेतलं आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमुक्ती, नुकसानभरपाई आणि हमीभाव या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून शिवसेना (उभठ) ने सरकारला कोपऱ्यात पकडण्याची मोहीम सुरू केली आहे.
फडणवीस आणि शिंदे गटाकडून आता यावर कोणती प्रतिक्रीया येते, हे पाहणे महत्वाचे राहील. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी प्रत्युत्तरासाठी सज्जतेचे संकेत दिले आहेत.
बिहार में जनसभा के दौरान कुर्सी टूटने पर गिरे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री चिराग पासवान pic.twitter.com/THfG5ZRlgK
— Priya singh (@priyarajputlive) November 3, 2025


