प्रचंड उष्मा भासत असताना बुधवारी पुन्हा तासगाव परिसराला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले. दमदार पावसाने द्राक्ष बागामध्ये पाणी साचले असून ताली भरून पाणी बाहेर पडले. मंगळवारी दुपारी सांगली, मिरजेसह काही भागात पिऊस झाला. सकाळी सांगलीत हलका पाऊस झाला असला तरी उष्माही वाढला होता.
सायंकाळी तासगाव तालुक्यातील अनेक गावांत सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस पडला. तालुक्यातील लोढे, कौलगे, मणेराजुरी, कवठेएकंद, चिंचणी परिसरात पाऊस झाला. मिरज तालुक्यात कवलापूर, बुधगाव भागातही पाऊस झाला असून पलूस तालुक्यातील वसगडे, ब्रम्हनाळ, भिलवडी भागात मध्यम पाऊस पडला.