
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई:
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा गडगडले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अनेक वर्षांनंतर एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत, मात्र अद्याप कोणतीही औपचारिक युती घोषणा झालेली नाही. दसरा मेळाव्याला या युतीची घोषणा होईल की नाही, याबाबत चर्चेला जोर लागलेला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे.
संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत. संवाद साधत आहेत. दसऱ्याला वैचारिक सोन्याचं अदान-प्रदान होऊ शकत. त्यांना निमंत्रणासाठी परंपरेप्रमाणे काम करावे लागेल. आमचा संघाचा मेळावा नाही, आमचा मेळावा परंपरेनुसार होतो. हा देश हिंदूंचा आहे आणि या देशात हिंदूत्व कायम राहणार आहे.”
यावरून अंदाज व्यक्त केला जात आहे की, दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा ऐतिहासिक सार्वजनिक संवाद होऊ शकतो, ज्यातून आगामी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये संभाव्य युतीची दिशा दिसून येईल.
साथच, राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावर टीका करत म्हटले, “गुजरात, सूरज आणि अहमदाबादमध्ये जाऊन शिंदेंनी त्यांचा दसरा मेळावा घ्यायला हवा. मुंबईचा मेळावा हा बाळासाहेब ठाकरे यांचा आणि ते उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू झाला, बाकी सर्व बोगस आहे. त्यांनी गुजरातमध्ये जाऊन मेळावा का घेतला नाही? जया शहाला त्यांच्या मेळाव्याला बोलावले पाहिजे.”
संजय राऊत यांचे विधान फक्त युतीबाबतच नाही, तर महाराष्ट्रातील राजकीय प्रस्थापना आणि विधानसभेतील राजकीय बळकटीवर देखील भाष्य करत असल्याचे दिसते. त्यांनी या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर टीका केली, ज्यामध्ये त्यांनी मेळाव्याचा ठराविक ठिकाण आणि पारंपरिक महत्त्व अधोरेखित केले.
संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या पूर व्यवस्थापनावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, “कॅबिनेट यांनी थाट माट न करता ज्या ठिकाणी पूरस्थिती आहे तिथे निर्णय घ्यायला हवा होता. 6 हजारांची मदत थट्टा आहे. बँक वसुली घोटाळा करणाऱ्या नेत्यांकडून वसूल करावी. सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीवरून गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.”
या विधानातून स्पष्ट होते की, राऊत फक्त राजकीय युतीवरच नाही, तर राज्यातील प्रशासन व आर्थिक व्यवस्थापनावर देखील लक्ष ठेवत आहेत.
राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीची घोषणा झाल्यास आगामी विधानसभेतील निवडणुकांवर मोठा परिणाम होऊ शकतो. युतीमुळे शिंदे गटाचे ध्रुवीकरण होऊ शकते, तसेच मुंबई आणि उपनगरात राजकीय समीकरणे बदलू शकतात.
संजय राऊतांचे विधान दसऱ्यापूर्वी उद्धव-राज युतीसाठी राजकीय वातावरण तयार करत असल्याचे दिसते. पूरग्रस्त भागातील मदतीसंबंधी टीका आणि शिंदे मेळाव्यावर प्रश्न उपस्थित करून राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये पुन्हा ताप आणला आहे. आता दसरा मेळावा आणि त्यानंतर होणारे निर्णय राज्यातील राजकारणासाठी निर्णायक ठरू शकतात.