
माणदेश एक्सप्रेस न्यूज | नवी दिल्ली :
उद्यापासून (1 ऑक्टोबर) वर्षाचा दहावा महिना सुरू होत आहे. हा महिना सण-उत्सवांनी गजबजलेला असून गांधी जयंतीपासून ते दिवाळीपर्यंत अनेक मोठे उत्सव या काळात साजरे होणार आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणेच बँकांच्या कामकाजावर याचा परिणाम होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, ऑक्टोबर महिन्यात देशभरातील बँका तब्बल 18 दिवस विविध कारणांमुळे बंद राहणार आहेत.
सुट्ट्या काही सण-उत्सव राष्ट्रीय पातळीवर तर काही राज्यनिहाय असतील. त्यामुळे ज्यांना या महिन्यात बँकांची महत्वाची कामं आहेत, त्यांनी सुट्ट्यांचे वेळापत्रक लक्षात घेऊन नियोजन करणं अत्यावश्यक आहे.
रविवार: 5, 12, 19 आणि 26 ऑक्टोबर रोजी सर्व बँका बंद.
शनिवार: 11 ऑक्टोबर (दुसरा शनिवार) आणि 25 ऑक्टोबर (चौथा शनिवार) रोजी बँका बंद.
1 ऑक्टोबर: महानवमी, दसरा, आयुधपूजा, दुर्गा पूजा (दसैन) – केरळ, ओडिशा, त्रिपुरा, कर्नाटक, तामिळनाडू, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, यूपी, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, झारखंड, मेघालय.
2 ऑक्टोबर: गांधी जयंती, दसरा, दुर्गा पूजा – संपूर्ण भारत.
3 व 4 ऑक्टोबर: दुर्गा पूजा – फक्त सिक्कीम.
6 ऑक्टोबर: लक्ष्मी पूजा – त्रिपुरा, पश्चिम बंगाल.
7 ऑक्टोबर: महर्षी वाल्मिकी जयंती व कुमार पौर्णिमा – हिमाचल प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, चंदीगड.
10 ऑक्टोबर: करवा चौथ – हिमाचल प्रदेश.
18 ऑक्टोबर: कटी बिहू – आसाम.
20 ऑक्टोबर: दिवाळी, नरक चतुर्दशी, कालीपूजा – जम्मू-काश्मीर, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, आसाम, ओडिशा वगळता इतर राज्यांमध्ये.
21 ऑक्टोबर: लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजा – महाराष्ट्र, ओडिशा, मणिपूर, जम्मू-काश्मीर, सिक्कीम, मध्य प्रदेश.
22 ऑक्टोबर: गोवर्धन पूजा, विश्वकर्मा दिवस, आयुध पूजा – चंदीगड, दिल्ली, गुजरात, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दादरा-नगर हवेली, दमन-दिव, लक्षद्वीप.
23 ऑक्टोबर: भाऊबीज, त्रगुप्त जयंती, लक्ष्मीपूजा, निंगोल चक्कूबा – सिक्कीम, पश्चिम बंगाल, मणिपूर, यूपी, गुजरात, हिमाचल प्रदेश.
27 ऑक्टोबर: छठ पूजा (संध्याकाळची पूजा) – पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड.
28 ऑक्टोबर: छठ पूजा (सकाळची पूजा) – बिहार, झारखंड.
31 ऑक्टोबर: सरदार वल्लभभाई पटेल जयंती – गुजरात.
बँका बंद असल्या तरी ग्राहकांची आर्थिक कामं थांबणार नाहीत. मोबाईल बँकिंग अॅप्स, इंटरनेट बँकिंग, एटीएम आणि UPI सारख्या सुविधा 24×7 उपलब्ध असतात.
NEFT, RTGS, IMPS, UPI द्वारे पैसे ट्रान्सफर
खाते शिल्लक तपासणी
बिले व EMI भरणे
डिजिटल KYC
फिक्स्ड/रिकरिंग डिपॉझिट सुरू किंवा बंद करणे
डेबिट/क्रेडिट कार्ड ब्लॉक करणे
चेकबुक/स्टेटमेंट ऑर्डर करणे
नवीन बचत खाते उघडणे
ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्यांची मोठी संख्या लक्षात घेता, बँकिंग व्यवहार आधीच पूर्ण करणं गरजेचं आहे. विशेषतः रोख रक्कम काढणं, कर्जाचे हप्ते भरणे किंवा इतर कागदोपत्री कामं वेळेवर करून ठेवली पाहिजेत. अन्यथा, सण-उत्सवाच्या गर्दीत अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.
ग्राहकांनी वेळेआधी नियोजन केल्यास, सुट्ट्यांमुळे कोणतंही महत्वाचं आर्थिक काम अडकणार नाही.