
माणदेश एक्सप्रेस न्यूज :-
केसांचे अकाली पांढरे होणे हे केवळ अनुवंशिकता किंवा ताणतणावामुळे होत नाही, तर आपल्या खाण्याच्या सवयी देखील त्यात मोठी भूमिका बजावतात. आधुनिक जीवनशैली, चुकीचे आहारपद्धती आणि तणाव या सगळ्या गोष्टींमुळे आजकाल तरुण वयातही केस पांढरे होऊ लागले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की जास्त साखर खाल्ल्याने केस अकाली पांढरे होऊ शकतात?
वाढत्या वयानुसार केस पांढरे होणे स्वाभाविक आहे. परंतु, चुकीच्या जीवनशैलीमुळे कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या वाढली आहे.
प्रथिनांची कमतरता
थायरॉईड समस्या
सूर्यप्रकाश आणि प्रदूषण
ताणतणाव
अनुवांशिक विकार
अशक्तपणा
या सर्वांबरोबरच अतिसाखर सेवन देखील एक महत्त्वाचे कारण ठरत आहे.
गाझियाबाद येथील मॅक्स हॉस्पिटलमधील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. सौम्या सचदेवा यांच्या मते,
गोड पदार्थ खाण्याचा केस पांढरे होण्याशी थेट संबंध नसला तरी दररोज साखरेचे जास्त सेवन शरीरातील ग्लुकोजची पातळी असंतुलित करते. यामुळे रक्तातील साखरेत वारंवार चढ-उतार होतात आणि त्याचा परिणाम केसांच्या मुळांवर व मेलेनिनच्या उत्पादनावर होतो.
मेलेनिन हे नैसर्गिक रंगद्रव्य आहे जे केसांना काळा किंवा तपकिरी रंग देते.
साखरेमुळे मुक्त रॅडिकल्स वाढतात
हे रॅडिकल्स केसांच्या मुळांना नुकसान पोहोचवतात
परिणामी मेलेनिनचे उत्पादन घटते
केस अकाली पांढरे होऊ लागतात
साखर जास्त खाल्ल्याने शरीरात हार्मोन्सचे असंतुलन निर्माण होते. विशेषतः तणावग्रस्त अवस्थेत लोक जास्त गोड पदार्थ खातात. काही काळासाठी मन शांत वाटते, पण दीर्घकाळात हार्मोनल बदलांमुळे केस लवकर पांढरे होतात.
खूप गोड पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स आणि जंक फूड टाळा
आहारात फळे, भाज्या, सुका मेवा आणि बिया यांचा समावेश करा
लोह, व्हिटॅमिन बी-१२ आणि प्रथिनेयुक्त आहार घ्या
योग, ध्यान करून ताण कमी करा
पुरेसे पाणी प्या जेणेकरून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील