केसगळती थांबवण्यासाठी, पचन व हृदयासाठी उपयुक्त; कढीपत्त्याचे अद्भुत आरोग्यदायी फायदे

0
34

माणदेश एक्सप्रेस न्यूज | आरोग्य विशेष :
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांना केसगळती, पचनसंस्था बिघडणे, लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या समस्या भेडसावत आहेत. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आरोग्य धोक्यात आलेले असते. अशावेळी आपल्या घरच्या घरी सहज उपलब्ध असणारा कढीपत्ता (Curry Leaves) आरोग्यासाठी वरदान ठरू शकतो. दक्षिण भारतीय पाककृतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा कढीपत्ता केवळ अन्नाची चव वाढवत नाही तर शरीराच्या एकंदर आरोग्यासाठी देखील अमृतासारखा आहे.

कढीपत्त्यातील पोषक घटक

कढीपत्त्यामध्ये जीवनसत्त्वे अ, ब, क, ई, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, तांबे, फायबर, फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. हे घटक शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि विविध आजारांपासून संरक्षण करतात.

आरोग्य फायदे

  1. हृदयासाठी उपयुक्त – कढीपत्त्यातील अँटीऑक्सिडंट्स वाईट कोलेस्टेरॉल कमी करून चांगले कोलेस्टेरॉल वाढवतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

  2. पचनक्रिया सुधारते – कढीपत्ता खाल्ल्याने पचन व्यवस्थित होते. फुगणे, सूज येणे, वायू किंवा अपचन यावर तो प्रभावी आहे.

  3. यकृतासाठी उपयुक्त – यात असलेले टॅनिन व व्हिटॅमिन ए, सी हे यकृताचे कार्य सुरळीत ठेवतात. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करतात.

  4. डोळ्यांचे आरोग्य राखतो – कढीपत्त्यातील व्हिटॅमिन ए दृष्टी मजबूत ठेवते. मोतीबिंदू व इतर डोळ्यांचे आजार टाळण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर आहे.

  5. केसगळतीवर रामबाण उपाय – नियमित कढीपत्ता खाल्ल्याने केसगळती, कोंडा, खाज यांसारख्या समस्या कमी होतात. त्यातील अँटीफंगल घटक टाळू निरोगी ठेवतात आणि केसांना चमक व मजबुती देतात.

  6. वजन कमी करण्यास मदत – कढीपत्त्याचे पाणी पिल्याने चयापचय सुधारते. शरीरातील चरबी जळून वजन कमी होण्यास मदत होते.

  7. रक्ताभिसरण सुधारते – याचे नियमित सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते. महिलांना मासिक पाळीच्या त्रासांपासून आराम मिळू शकतो.

  8. मधुमेह नियंत्रणात ठेवतो – कढीपत्ता इन्सुलिनचे उत्पादन वाढवतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.

  9. जखमा लवकर भरतात – कढीपत्त्याची पेस्ट जखमेवर लावल्यास सूज, खाज, जळजळ कमी होते. त्यातील अँटीमायक्रोबियल गुणधर्म संसर्ग टाळतात.

घरगुती उपाय

  • दररोज सकाळी काही कढीपानं चावून खाल्ल्यास पचन सुधारते.

  • कढीपत्त्याचे पाणी उकळून प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.

  • केसगळतीसाठी कढीपत्त्याचा तेलामध्ये वापर केल्यास चांगला परिणाम होतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here