‘या’ ड्रायफ्रूट्सचे सेवन आरोग्यासाठी वरदान; आजच तुमच्या आहारात करा समावेश

0
121

माणदेश एक्सप्रेस न्यूज | हेल्थ डेस्क :
शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा मानला जातो. आहारामध्ये नियमितपणे फळे, भाज्या, धान्य यासह ड्रायफ्रूट्सचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते. ड्रायफ्रूट्सपैकी बदाम, काजू, अक्रोड, पिस्ता हे नेहमी लोकप्रिय मानले जातात. यामध्ये पिस्ता हा आरोग्यासाठी खास फायदेशीर म्हणून ओळखला जातो. त्याचा वापर नाश्त्यातील पदार्थ, मिठाई, पेस्ट्री यामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. किंमतीत थोडा महाग असला तरी पिस्त्यामधील पोषक घटक आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.


पिस्ता खाण्याचे आरोग्यदायी फायदे

🔸 रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो
पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी6, प्रथिने, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. हे घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करून आजारांपासून बचाव करतात.

🔸 डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त
पिस्त्यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारखे अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे घटक डोळ्यांना होणाऱ्या आजारांपासून संरक्षण देतात आणि डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यास मदत करतात.

🔸 वजन नियंत्रणात मदत
पिस्ता हा कमी कॅलरीयुक्त पण प्रोटिन्स आणि फायबरने समृद्ध असा ड्रायफ्रूट आहे. त्यामुळे लवकर पोट भरते आणि भूक कमी लागते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांसाठी पिस्ता हा आदर्श स्नॅक ठरू शकतो.

🔸 हृदय व त्वचेसाठी फायदेशीर
पिस्त्यातील हेल्दी फॅट्स रक्तातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार आणि तजेलदार ठेवतात.

🔸 गर्भवती महिलांसाठी उपयुक्त
गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीराला अतिरिक्त पोषणाची गरज असते. पिस्त्यामधील ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स गर्भवती महिला आणि बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भावस्थेत पिस्त्याचा आहारात समावेश करता येतो.

🔸 रक्तपेशी आणि मासपेशींच्या वाढीस मदत
प्रोटिन्सने समृद्ध पिस्ता शरीरात नवीन रक्तपेशी तयार होण्यासाठी आणि मासपेशींच्या विकासासाठी उपयुक्त मानला जातो.


पिस्ता खाण्याची योग्य पद्धत

तज्ञांच्या मते, पिस्त्याचा स्वभाव उष्ण असल्यामुळे तो भिजवून सेवन करणे चांगले. पाण्यात काही तास पिस्ता भिजवल्यानंतर खाल्ल्यास तो अधिक फायदेशीर ठरतो. तसेच तो मिठाई, खीर, हलवा किंवा ओट्समध्ये मिक्स करूनही खाल्ला जाऊ शकतो. परंतु अतिसेवन टाळावे, कारण जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढण्याचा त्रास होऊ शकतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here