
माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई :
सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी रेल्वेकडून आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटीस (CEN) 04/2025 अंतर्गत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध झोनमध्ये 300 हून अधिक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठीची अधिसूचना जारी झाली असून, इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
👉 अर्ज प्रक्रिया कधी सुरु होणार?
अर्जाची सुरुवात : 15 सप्टेंबर 2025
अर्जाची अंतिम तारीख : 14 ऑक्टोबर 2025
उमेदवारांनी RRB च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा.
अर्ज शेवटच्या क्षणी टाळण्यासाठी रेल्वेने वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
👉 पात्रता काय असणार?
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : किमान 20 वर्षे आणि कमाल 33 वर्षे.
राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार वयात सूट मिळणार आहे.
👉 पगार किती मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना ₹35,400 (लेव्हल 6) मूलभूत वेतन मिळेल.
याशिवाय इतर भत्ते मिळाल्यामुळे उमेदवारांना हातात अधिक पगार मिळणार आहे.
त्यामुळे ही नोकरी आर्थिक दृष्ट्या आकर्षक मानली जात आहे.
👉 अर्ज शुल्क किती?
सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी : ₹500
SC/ST/महिला/दिव्यांग उमेदवारांसाठी : ₹250
👉 निवड प्रक्रिया कशी होणार?
संगणक आधारित परीक्षा (CBT-1 आणि CBT-2) – दोन टप्प्यांत होईल.
कौशल्य चाचणी (Skill Test) – पात्र उमेदवारांसाठी.
कागदपत्र पडताळणी (Document Verification)
वैद्यकीय तपासणी (Medical Test)
यानंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.
🚉 उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
रेल्वेच्या नोकऱ्या या कायमस्वरूपी आणि सुरक्षित मानल्या जातात. पगाराबरोबरच भत्ते, पदोन्नतीची संधी आणि इतर सुविधा मिळतात. त्यामुळे ही भरती तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी ठरू शकते.