“वय नाही हिम्मत लागते” काठीनं तोंड दाबलं, अंदाज घेतला अन् क्षणात पकडला साप; चिमुकल्याचं धाडस पाहून व्हाल हैराण, थरारक VIDEO व्हायरल

0
393

Viral video: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. यामध्ये लहान मुलांचे व्हिडीओ तर तुफान व्हायरल होतात. कधी कधी लहानगे असं काही करतात की मुर्तीपेक्षा किर्ती महान असं म्हणावं लागेल. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

 

साप दिसताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. लोक भितीनं वाट मिळेल तिथे पळू लागतात. अन् त्यामध्ये जर का किंग कोब्रा असेल तर मग काय विचारायलाच नको. कारण कोब्रा हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याच्या एका दंशानं सुद्धा माणसाचा मृत्यू होऊ शकतो. पण या अत्यंत विषारी सापाशी चक्क एका चिमुकल्यानं पंगा घेतला. आश्चर्याची बाब म्हणजे एखाद्या खेळण्यासोबत खेळावं तसं हा मुलगा सापाची शेपटी ओढून त्याला पकडत आहे.

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक विषारी साप सरपटत या मुलाच्या दिशेने येतो. पण हा मुलगा जराही घाबरत नाही. उलट हातातील काठीच्या मदतीने तो सापाचं तोंड दाबतो आणि मग त्याचा जबडा पकडून त्याला उचलतो. आश्चर्याची बाब म्हणजे, सापासारखा खतरनाक जीव हातात असताना त्याच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसत नाही. उलट एखादा गांडूळ पकडावा, त्या सहजतेने त्याने साप पकडला आहे.

 

हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी मात्र चांगलेच खवळले आहेत. कारण या सापाचा एक साधा दंश सुद्धा माणसाचा जीव घेऊ शकतो. अन् या मुलाचे पालक त्याला इतक्या विषारी सापासोबत खेळू देत आहेत. दरम्यान काहींनी त्याच्या धाडसाचं कौतुक देखील केलंय. कदाचित हा साप पाळिव असावा किंवा त्याचं विष काढून टाकण्यात आलं असावं.

 

एका युजरने कमेंट करताना लिहिले. ‘छोट्या पॅकेटने चमत्कार केला.’कमेंट करताना दुसऱ्या युजरने लिहिले, ‘हा छोटू हा एक मोठा धमाका आहे.’ आणखी एका युजरने कमेंट केली आहे की, ‘छोटा-मोठा असा फरक नसतो, ज्याच्याकडे धैर्य असते तोच जिंकतो.’ दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘मोठे असण्याने काही फरक पडत नाही, लढण्यासाठी तुमच्याकडे हृदय असणे आवश्यक आहे.’


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here