ग्रामस्थांची भूमिका ठाम; मापटेमळा वगळणार की पेटणार आंदोलन?

0
453

माणदेश एक्सप्रेस न्यूज

आटपाडी : आटपाडी नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेत मौजे मापटेमळा हे महसूली गाव समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र या निर्णयाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला असून, मापटेमळा हे गाव नगर पंचायतीच्या हद्दीतून तात्काळ वगळावे, अशी मागणी काल (दि.२१) नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्याकडे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.

 

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, परिशिष्ट २ (हददींची व्याप्ती व वर्णनाबाबत) मध्ये मौजे मापटेमळा समाविष्ट करणे अन्यायकारक आहे. त्यामुळे गाव तात्काळ वगळून, सुधारीत प्रभाग रचना प्रसिद्ध करावी. अन्यथा ग्रामस्थांना जन आंदोलन, मोर्चा आणि धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या निवेदनावर चंद्रकांत काळे, रघुनाथ यादव, अनिल यादव, दत्तात्रय व्हनमाने, अरविंद जाधव, विरेंद्र माळी, शिबाजी बनसोडे, राहुल काबुगडे, रेवण जाधव यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here