“कृपया…” पुणेकरांचा विषय हार्ड! आता D-Mart मध्ये लावली अशी पाटी की, वाचून तुम्हीही पोट धरून हसाल

0
361

D Mart Viral Pati:
पुणेरी पाट्या हा विषय नेहमीच चर्चेत राहतो. पुणेकरांच्या या पाट्या जितक्या खोचक असतात तितक्याच त्या वाचताना मजा देतात. “नियम म्हणजे नियम” हे पुणेकरांचे तत्त्व या पाट्यांतून स्पष्ट दिसते. पण आता हा पुणेरी पाट्यांचा ट्रेंड सरळ D-Mart मध्ये पोहोचला आहे आणि तिथे लावलेली एक पाटी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

डिमार्टची व्हायरल पाटी

सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसते की, डिमार्टच्या एका विभागात मोठ्या अक्षरात लिहिलेली पाटी लावली आहे –
“कृपया साखर व शेंगदाणे खाऊ नये.”

ही पाटी पाहून ग्राहक चांगलेच हसत आहेत. कारण सामान्यतः दुकानदार किंवा मॉल्समध्ये “कृपया वस्तू हाताळू नका”, “कृपया वस्तू खाली ठेवू नका” अशा सूचना आढळतात. मात्र, “साखर व शेंगदाणे खाऊ नये” अशी थेट सूचना कुणी पाहिली नव्हती.

का लागली अशी पाटी?

डिमार्टसारख्या मोठ्या मॉलमध्ये साखर व शेंगदाणे खुले स्वरूपात ठेवले जातात. ग्राहक त्यांची गुणवत्ता पाहण्यासाठी हात लावतात. मात्र अनेकदा काही लोक त्याचे चाखण्यासाठी थेट खाऊ लागतात. यामुळे दुकानाचे नुकसान होते, शिवाय इतर ग्राहकांसाठी स्वच्छतेचा मुद्दाही गंभीर ठरतो. त्यामुळे डिमार्ट प्रशासनाने सरळसरळ “खाऊ नका” अशी पाटी लावून प्रश्न सोडवला.

सोशल मीडियावर चर्चा

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @drive_trendy या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला “फुकटचे साखर शेंगदाणे, अखेर डीमार्टला कळलेच” अशी मजेशीर कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत असून आतापर्यंत 419k पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.

युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

नेटिझन्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

  • एका युजरने लिहिलं, “अरे यार, शास्त्र असतं ते!”

  • दुसऱ्याने टोमणा मारला, “एवढी मोठी कंपनी आणि असा बोर्ड… असं तर साधा किराणा दुकानदारसुद्धा सांगत नाही.”

  • एकाने लिहिलं, “यांच्यापेक्षा शेतकरी बरा, ‘घ्या खा’ म्हणतो.”

  • तर दुसऱ्याने गंमतीत विचारलं, “डीमार्ट काजू-बदाम कधी टेस्टिंगसाठी ठेवणार?”

  • आणखी एका युजरची मजेदार प्रतिक्रिया, “बहुतेक हा डिमार्ट पुण्याचाच आहे.”

पुणेरी पाट्यांचा थाट कायम!

‘पुणेरी पाटी’ म्हटली की तिच्यातील विनोद, खोचकपणा आणि थेटपणा हे वेगळे सांगायला नको. पण आता डिमार्टमध्ये दिसलेली ही पाटी पुणेरी स्टाईलची आठवण करून देतेय. नियम पाळायला लावायचे असतील तर अशीच थेट सूचना लागते, हेच या पाटीतून स्पष्ट होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by DriveTrendy (@drive_trendy)


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here