मिठाच्या डब्यात कडुलिंबाची पाने ठेवण्यामागचं खरं कारण – अंधश्रद्धा नाही, विज्ञान आणि अनुभवावर आधारित उपाय

0
172

माणदेश एक्सप्रेस न्यूज |
पावसाळा आला की स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींना ओलाव्याचा त्रास होतो. साखर, मीठ, मसाले आणि धान्य लवकर ओलावा धरतात, गुठळ्या होतात, तर कधी बुरशी व किडींचा प्रादुर्भावही वाढतो. अशावेळी, आपल्या आई-आजी वापरत असलेले काही घरगुती उपाय आजही तेवढेच प्रभावी ठरतात. त्यापैकीच एक म्हणजे मिठाच्या डब्यात कडुलिंबाची पाने ठेवणे. हा काही अंधश्रद्धेचा भाग नाही, तर विज्ञान व अनुभवावर आधारित घरगुती जतन पद्धत आहे.


कडुलिंबाची पाने मिठाच्या डब्यात ठेवण्याचे फायदे

कडुलिंबाच्या पानांमध्ये नैसर्गिकरित्या बॅक्टेरियाविरोधीबुरशीविरोधी गुणधर्म असतात. यामुळे मिठाच्या डब्यात ठेवलेली पाने खालील फायदे देतात –

  1. ओलावा कमी होतो:
    कडुलिंबाची पाने मिठातील ओलावा शोषून घेतात, त्यामुळे मीठ कोरडे राहते आणि गुठळ्या होत नाहीत.

  2. बुरशी व बॅक्टेरिया रोखले जातात:
    पानांमधील नैसर्गिक घटक मिठात सूक्ष्मजंतू वाढू देत नाहीत.

  3. कीटकांचा त्रास कमी होतो:
    कडुलिंबाचा किंचित कडवटपणा आणि तीव्र वास हा कीटकांना दूर ठेवतो.


पाने कशी साठवायची?

  • ताजी व कोरडी पाने निवडा: ओलसर पाने वापरल्यास उलट मीठ लवकर खराब होऊ शकते.

  • पाने धुऊन उन्हात पूर्णपणे वाळवा.

  • मिठाच्या डब्यात थेट ठेवू शकता किंवा लहान जाळीदार पिशवीत भरून ठेवू शकता.

  • मीठाच्या एका डब्यासाठी ४-५ पाने पुरेशी आहेत.

  • पाने दर १५-२० दिवसांनी बदलत राहावीत.


पावसाळ्यात हा उपाय का आवश्यक?

पावसाळ्यात हवेत ओलावा जास्त असल्याने मीठ पटकन ओलसर होते, गुठळ्या होते व कधी बुरशीही धरते. कडुलिंबाच्या पानांचा हा साधा उपाय मीठ दीर्घकाळ ताजं व वापरण्यायोग्य ठेवतो. हा उपाय केवळ पावसाळ्यातच नव्हे तर वर्षभर कधीही करून पाहू शकता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here