
माणदेश एक्सप्रेस न्यूज :-
आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण नाश्त्यात किंवा टिफिनमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करतो. मखाना आणि भिजवलेले काळे चणे हे त्यापैकीच दोन लोकप्रिय पर्याय आहेत. हे दोन्ही पोषकतत्वांनी समृद्ध असून शरीरासाठी फायदेशीर मानले जातात. मात्र, या दोघांपैकी नेमकं कोणतं अधिक फायदेशीर? हा प्रश्न अनेकांना पडतो.
दिल्लीतील श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. प्रिया पालीवाल यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या मते, भाजलेले मखाने आणि भिजवलेले काळे चणे दोन्ही आरोग्यासाठी उपयुक्त आहेत, मात्र त्यांच्या पोषकतत्वांमध्ये आणि खाण्याच्या पद्धतीत फरक आहे.
मखान्याचे फायदे
फायबर, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत
हलके व सहज पचणारे
वजन कमी करू इच्छिणारे व मधुमेहींसाठी फायदेशीर
कमी किंवा अजिबात तेलाशिवाय भाजून स्नॅक म्हणून खाता येते
पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते
काळ्या चण्याचे फायदे
प्रथिने, लोह, फॉस्फरस, फायबर आणि व्हिटॅमिन B6 मुबलक प्रमाणात
शरीराला ऊर्जा देतात, स्नायूंचा विकास करतात
पोटाचे आरोग्य सुधारतात व रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात
भिजवल्याने अधिक पचण्यास सोपे व पोषकतत्वांचे शोषण वाढते
कोणासाठी कोणता पर्याय योग्य?
मुलं, वृद्ध आणि सक्रिय लोकांनी सकाळी भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास फायदा
वजन कमी करायचे असल्यास किंवा हलका नाश्ता हवा असल्यास भाजलेले मखाने योग्य
तज्ज्ञांच्या मते, दोन्ही पदार्थ आहारात संतुलित पद्धतीने समाविष्ट केल्यास शरीराला सर्वाधिक लाभ होतो.