लोकल प्रवाशांनो लक्ष द्या! हार्बर मार्गावर आजपासून तीन दिवस मेगाब्लॉक, अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलले

0
48

माणदेश एक्सप्रेस न्यूज | मुंबई

मुंबईची लाईफलाईन मानला जाणारा हार्बर रेल्वे मार्ग येत्या तीन दिवसांसाठी मेगाब्लॉकमुळे विस्कळीत होणार आहे. वाशी स्थानकावरील सिग्नल प्रणालीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने ७, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी रात्री १०:४५ ते पहाटे ३:४५ या वेळेत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक घोषित केला आहे. याचा परिणाम म्हणून अनेक लोकल गाड्या रद्द, अंशतः रद्द किंवा मार्गांतरित करण्यात आल्या आहेत.

 

कचा कालावधी

बुधवार, गुरुवार, शुक्रवार
रात्री १०:४५ ते पहाटे ३:४५

 

रद्द किंवा अंशतः धावणाऱ्या गाड्यांची यादी

बेलापूरहून रात्री ८:५४ ला सुटणारी CSMT लोकल फक्त वाशीपर्यंत धावेल.
बेलापूरहून रात्री ९:१६ ची CSMT लोकल वडाळा रोडपर्यंतच धावेल.
वांद्रेहून रात्री १०:०० ला सुटणारी CSMT लोकल वडाळा रोडपर्यंतच धावेल.
पनवेलहून रात्री १०:५० व ११:३२ वाजता सुटणाऱ्या वाशी लोकल नेरूळपर्यंतच धावतील.

 

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

वाशीहून सुटणाऱ्या अप लोकल्स (पहाटे):
४:०३
४:१५
४:२५
४:३७
४:५०
५:०४

CSMTहून वाशीच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन लोकल्स:

९:५०
१०:१४
१०:३०

स्थानक बदलून सुटणाऱ्या लोकल्स

वडाळा रोड – पनवेल लोकल्स (गुरुवार पहाटे ५:०६ आणि ५:५२):
आता नेरुळहून सुटतील.
CSMT – पनवेल लोकल्स (गुरुवार पहाटे ४:५२ आणि ५:३०):
आता नेरुळहून सुटतील.
CSMT – गोरेगाव लोकल (गुरुवार पहाटे ५:१०):
आता वडाळा रोडहून सुटेल.

 

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की,
प्रवास करण्यापूर्वी लोकल वेळापत्रक तपासूनच बाहेर पडावे.
शक्य असल्यास या कालावधीत प्रवास टाळावा.
पर्यायी मार्गांचा विचार करावा.
या कामामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here