करगणीतील घृणास्पद सौदेबाजी प्रकरणी अखेर “त्या” “महेशभाऊ” वर खंडणीचा गुन्हा दाखल ; आटपाडी तालुका शिवसेनेकडून गुन्हा दाखल करण्याची केली होती मागणी

0
2616

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : करगणी (ता. आटपाडी) येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार, ब्लॅकमेलिंग व आत्महत्येच्या गंभीर प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेतील आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांच्या नावाने पैसे मागितल्याचे एक कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, हे रेकॉर्डिंग महेश नामक तरुणाचे असून, तो गेल्या काही दिवसांत पोलिसांविरोधात आंदोलनाच्या आघाडीस राहिलेला असून त्याच्याविरुद्ध पीडित मुलीच्या आत्महत्येमागे लैंगिक अत्याचाराचा प्रकार आणि त्या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. असल्याने त्याच्या विरुद्ध खंडणीचा आणि पोलिसांची प्रतिमा मलीन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आटपाडी तालुका शिवसेनेने आटपाडी पोलिसांना निवेदन देखील दिले होते.

करगणी (ता. आटपाडी) येथील महेश सरगर याच्याविरोधात मोबाईलवरून सातत्याने फोन करून खंडणीची मागणी करत धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याने, याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात बीएनएस कायद्यांतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी धनाजी शंकर माने (वय २३, रा. बनपुरी, ता. आटपाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी महेश सरगर (रा. करगणी, ता. आटपाडी जि. सांगली) याने दिनांक १० जुलै ते १४ जुलै २०२५ या कालावधीत फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर वेळोवेळी कॉल करून ५०,००० रुपयांची खंडणी मागितली.

आरोपीने स्वतःच्या मोबाईल क्रमांकावरून फोन करत फिर्यादीस धमकी दिली की, “तु शहाणा झालास का? फोन रिसिव्ह करायला तुला लाज वाटते का? विषय मिटव नाहीतर गेमच करेन,” अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. आरोपीने पोलिसांचे नाव वापरून ‘पोलीसांमार्फत कारवाई करू, किंवा तुझे नाव गुन्ह्यात घेऊ’ असे म्हणत मानसिक त्रास दिला.

शिवाय, आरोपीने ‘जर नाव सांगायचे नसेल तर ५०,००० रुपये द्यावे लागतील’ अशी धमकी दिली. तडजोडीच्या नावाखाली सुरुवातीला ४०,००० रुपयांची मागणी करण्यात आली होती व तत्काळ १०,००० रुपये पाठवण्याचा तगादा लावण्यात आला. या सर्व प्रकारामुळे फिर्यादीने आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात भारतीय नवीन दंड संहिता (बीएनएस) कलम ३०३(२), ३०८(३), ३०८(६) आणि पोलिस अप्रितीची भावना चेतावणे अधिनियम १९२२ चे कलम ३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस तपास सुरू असून आरोपीचा मोबाइल नंबर व इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. आरोपीचा गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली तरी खंडणीसारख्या गंभीर प्रकरणात त्याचा सहभाग लक्षात घेता पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here