
माणदेश एक्सप्रेस न्यूज | सांगली, 24 जुलै
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून हरकतींचा वर्षाव झाला आहे. दिनांक 14 जुलै रोजी अधिसूचना जाहीर झाल्यानंतर 14 ते 21 जुलैदरम्यान एकूण 19 हरकती प्राप्त झाल्या असून त्यामध्ये गटासाठी 16 व गणासाठी 3 हरकतींचा समावेश आहे. ही माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी दिली.
हरकती प्राप्त होण्यामध्ये आटपाडी तालुका आघाडीवर असून तेथून एकूण 7 हरकती (गट 6, गण 1) दाखल झाल्या आहेत. खानापूर, कडेगाव, पलूस व शिराळा तालुक्यांमधून मात्र एकही हरकत प्राप्त झालेली नाही, हे विशेष.
प्राप्त हरकतींची तपासणी करून अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे अनेक भागांत राजकीय हालचालींना वेग आला आहे. हरकतींचा न्याय्य निपटारा करण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत झाल्या आहेत.
📝 जिल्ह्यातील तालुकानिहाय हरकती पाहण्यासाठी येथे क्लिक करा👇