
Kobra Attack on Man Viral Video : जंगल हे चित्तथरारक निसर्ग सौंदर्य आणि विविध वन्यजीवांचे घर आहे. पण जंगलात वावरणे माणसांसाठी तितकेच धोक्याचे देखील आहे. जंगलात पावलो पावली मृत्यू दडलेला असतो. जंगलात अनेक हिंसक प्राणी राहतात ज्यांचा सामना करवा लागतो. कधी वाघ, कधी सिंह, कधी कोल्हा, कधी लांडगा, कधी मगर, कधी अस्वल तर कधी विषारी साप जंगलात आढळतात जे दाट झाडी झुडपात दबा धरून लपतात अन् संधी मिळताच आपल्या भक्ष्यावर हल्ला करतात. जंगलात होणाऱ्या शिकारीच्याटनांचे थरारक व्हिडिओ आज काल सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलिकडेच एका व्हायरल व्हिडिओमध्ये जगंलात पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असताना तरुणांवर प्राणघातक विषारी कोब्रा त्यांच्या हल्ला करतो. पुढे जे घडते ते पाहून काळजात धस्स होते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे नेटकऱ्यांना धक्का बसवा आहे,.. व्हिडिओमध्ये एका भयानक कोब्राने एका तरुणावर हल्ला केल्याचे दाखवले दिस आहे. हा तरुण त्याच्या मित्रांबरोबर पाण्याच्या प्रवाहाजवळ खेळत आहे. काही तरुण पाण्यात पोहत आहे तर एक तरुण पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूला झुडपांशेजारी बसलेला दिसत आहे. अचानक जंगलातून भलामोठ्ठा कोब्रा बाहेर येतो अन् तरुणावर हल्ला करतो. कोब्रा तरुणासा दंश करण्याचा प्रयत्न करतो पण तरुणांच्या लक्षात येताच तो तात्काळ उडी मारतो ज्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचतो. पुढच्याच क्षणी, त्याच्या आजूबाजूचे सर्वजण जीव वाचवण्यासाठी धावतात पाण्यातून बाहेर धावत येतात. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे आणि नेटिझन्स मजेदार कमेंट्स देत आहेत.
पुढच्याक्षणी त्यांच्या मजेशीर सहल भयानक वळण घेते कारण किनारी बसलेला एक तरुणावर जवळजवळ एका महाकाय सापाचे आश्रयस्थान बनतो, कदाचित अजगर. साप हळू हळू आणि शांतपणे त्या माणसावर मागून हल्ला करतो परंतु त्याच्या प्रतिक्षिप्त प्रतिक्रियांमुळे तो एका सेकंदात पळून जातो आणि आजूबाजूचे सर्वजण जीव वाचवण्यासाठी पळू लागतात.