
पुणे : प्रसिद्ध लोकनृत्यांगना गौतमी पाटील सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण यावेळी विषय आहे तिचा खास मराठमोळा लूक. नुकतेच गौतमीने आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर काही फोटो शेअर केले असून, त्यामध्ये ती निळ्या रंगाच्या खणाच्या साडीत, मोत्यांची नथ आणि गुलाबी रंगाच्या फेट्यात झळकत आहे. तिच्या या पारंपरिक लूकने चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.
गौतमी पाटीलने निळ्या रंगाची खणाची साडी नेसून त्यावर पारंपरिक मराठमोळी नथ परिधान केली असून, गुलाबी रंगाचा फेटा तिच्या लूकला चारचाँद लावत आहे. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करताच काही तासांत हजारो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. अनेकांनी “खऱ्या अर्थाने मराठमोळी राणी” अशा प्रतिक्रिया दिल्या.
काही दिवसांपूर्वीच तिचं ‘सुंदरा’ हे गाणं साईरत्न एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालं होतं. हे गाणं लाँच होताच ते प्रचंड व्हायरल झाले आणि अनेक रील्स व शॉर्ट्समध्ये वापरले गेले. याच गाण्यासाठी हा खास पारंपरिक लूक असल्याची शक्यता आहे.
गौतमीने आपल्या करिअरची सुरुवात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकनृत्य कार्यक्रमांमधून केली होती. हळूहळू तिच्या कार्यक्रमांना अफाट प्रतिसाद मिळू लागला आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचली. आज तिचं नाव घेतलं की, “सबसे कातिल, गौतमी पाटील” ही ओळख सर्वत्र ऐकायला मिळते.
मराठमोळ्या वेशभूषेत आपला सांस्कृतिक वारसा जपत गौतमी पाटीलने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.