‘सितारे जमीन पर’ने १३ दिवसांत ‘इतक्या’ कोटींची केली कमाई; आमिर खानचा जलवा कायम

0
77

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|मुंबई : अभिनेता आमिर खान आणि जिनिलिया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशाची घौडदौड करत आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या १३ दिवसांत या चित्रपटाने जगभरात २०० कोटी रुपयांची कमाई करत मोठा टप्पा पार केला आहे.

 

२० जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बुधवारी म्हणजेच १३ व्या दिवशी भारतात २.७५ कोटी रुपयांची कमाई केली. तर एकूण भारतीय कमाई आता १३२.९ कोटी रुपये झाली आहे. ‘सॅल्कनिक’च्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने जगभरात २०० कोटींचा टप्पा पार केला असून हा आकडा दिवसेंदिवस वाढण्याची शक्यता आहे.

 

प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद
चित्रपटाच्या कथानकाला, अभिनयाला आणि सादरीकरणाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः आमिर खानचा संयत अभिनय आणि जिनिलियाची सहज भूमिका यांचं विशेष कौतुक होत आहे. यामुळे चित्रपट प्रेक्षकांना भावतोय आणि त्यामुळेच त्याची कमाई सातत्याने वाढत आहे.

 

मनोरंजनविश्वात चढाओढ
दरम्यान, सध्या अनेक नवीन हिंदी व मराठी चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी लाभली आहे. काही चित्रपटांना संमिश्र तर काहींना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय, मराठी रंगभूमीवर देखील नाटकांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here