
Viral Video : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. दिवसरात्र मेहनत करून तो शेतात धान्य पिकवतो ज्यावर आपले जेवण अवलंबून असते. त्यांच्या कष्टांमुळेच आपल्याला दोन वेळचे अन्न मिळते. अनेकदा त्याला अतिवृष्टी, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. यामुळे पिकांचे नुकसान होते आणि कधी कधी तो कर्जबाजारी सुद्धा होतो. या अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याचे आभार मानावे तितके कमी आहे. सध्या अशाच एका शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला भर पावसात भातलावणी करताना काही शेतकरी दिसत असतील. त्यातला एक शेतकरी चक्क पावसाचा आनंद लूटत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य येईल.
भातलावणी म्हणजे भातशेती करताना भात लावण्यासाठी जी रोपे लावतात त्याला भातलावणी असे म्हणतात. ही रोपे हाताने किंवा यंत्राद्वारे लावली जातात. भातलावणीसाठी भरपूर पाऊस असावा लागतो कारण भातशेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे सहसा जून जुलै महिन्यात भातलावणी केली जाते. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला भातलावणी करताना शेतकरी दिसेल. भर पावसात भातलावणी सुरू असताना एका शेतकऱ्याला मोह आवरला नाही आणि तो पावसाचा आनंद लुटत डान्स करताना दिसतो. भातलावणी करताना पाऊस पडतोय, यापेक्षा दुसरा आनंद शेतकऱ्यासाठी कोणताच नाही. हा आनंद तो त्याच्या डान्समधून व्यक्त करतो. हा व्हिडीओ कोकणातील आहे शेतकऱ्याचे मनसोक्त डान्स करणे सोशल मीडियावर नेटकऱ्यांना चांगलेच आवडले आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे आयुष्य परत नाही. गावातील माणसं खुप आनंदी असतात” तर एका युजरने लिहिलेय, “दादा शेतामध्ये खूप मेहनत करावी लागते तरीदेखील किती आनंदी राहतात शेतकरी” आणखी एका युजरने लिहिलेय, “शेताच्या बांधावर बसून शेतीची कामं होत नाहीत आणि शेतकऱ्याच्या जन्माला आल्याशिवाय त्याची दुःखे कळत नाहीत!” एक युजर लिहितो, “ही मजा फक्त कोकण चा शेतकरी घेऊ शकतो” तर एक युजर लिहितो, ” कामं काय होतंच राहिलं र..पण कामातून आनंद असा मिळाला तर बातच न्यारी आहे”