
Python Kills Monkey Video: सोशल मीडियावर पुन्हा एकदा निसर्गाचा क्रूर नियम समोर आला आहे. इथे रोज काही ना काही धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी हसवणारे, तर कधी थरकाप उडवणारे. यावेळी एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून मन सुन्न होईल. जंगलाच्या निवांत वातावरणात घडलेला हा प्रसंग, बलवान आणि कमकुवत यांच्यातील संघर्ष दाखवतो. जिथे अजगरानं एका निष्पाप माकडाला शिकार केलं. हे दृश्य निसर्गाच्या कठोर सत्याची आठवण करून देतं इथे शक्तिशालीच टिकतो.
सध्या सोशल मीडियावर अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माकड मोठ्या अजगराच्या भीषण शिकारीचा बळी ठरताना दिसत आहे. जंगलातल्या एका कोपऱ्यात शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओत निसर्गाचं क्रूर आणि वास्तव रूप पाहायला मिळतं. एका अजगरानं जंगलात काय केलं ते पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. हा थरारक व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल. जिवंत माकडाची हळूहळू होणारी शिकार, आणि निसर्गाचं क्रूर वास्तव… व्हिडीओ आणि संपूर्ण घटना जाणून घ्या खाली…
व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक बिचारा माकड जीव वाचवण्यासाठी झगडतोय. त्याच्या हालचालींमधून भीती, वेदना व हतबलता स्पष्ट जाणवते. पण काही क्षणांतच एक विशाल अजगर त्याला आपल्या प्रचंड ताकदीच्या कुंडलीत घट्ट आवळतो. माकड जितकं सुटण्याचा प्रयत्न करतो, तितकीच अजगराची त्याच्याभोवतीची कुंडली अधिक घट्ट होत जाते. काही वेळातच माकडाचा श्वास बंद होतो आणि त्याचं शरीर निष्प्राण होतं.
अजगराची खरी ताकद त्याच्या मजबूत मांसपेशींमध्ये असते. शिकार कुंडलीत अडकवल्यावर, अजगर शरीर इतकं दाबतो की, माकडाची हाडं मोडतात आणि तो श्वास कोंडला गेल्यानं मरतो. नंतर तो संपूर्ण शिकार हळूहळू गिळून टाकतो.
हा व्हिडीओ पाहून अनेक जण हादरले आहेत. लाखो लोकांनी तो पाहिला असून, त्यावर हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत. काही लोकांनी याला निसर्गाचं कटू वास्तव म्हटलं आहे; तर काही जण माकडाच्या असहायतेनं व्यथित झाले आहेत.
या व्हिडीओनं पुन्हा एकदा जंगलाचा नियम जगासमोर आणला आहे. “इथे फक्त शक्तिशालीच टिकतो.” जंगलात दररोज असाच मृत्यू आणि जगण्याचा संघर्ष सुरू असतो.