‘जस्सी पाजी इज बॅक!’ अजय देवगणचा कॉमेडी आणि अॅाक्शन सिनेमाचा धमाल व्हिडीओ प्रदर्शित

0
41

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सन ऑफ सरदार’ या सुपरहिट सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनी या सिनेमाचा सिक्वल ‘सन ऑफ सरदार २’ आता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अजय देवगण पुन्हा एकदा जस्सी पाजीच्या भूमिकेत धमाकेदार पुनरागमन करणार आहे. सिनेमाचा पहिला व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

 

या भागात कथा पंजाबमधून थेट स्कॉटलंडमध्ये पोहोचते. व्हिडीओमध्ये “पंजाबमध्ये वाचला, आता स्कॉटलंडमध्ये जीव वाचवणार का?” असा मजेदार सवाल विचारण्यात आला आहे. यावरून अंदाज लावता येतो की, जस्सी पाजी यंदा एका नव्या आणि परदेशी अडचणीत अडकलेला दिसणार आहे. विशेष म्हणजे, यावेळीही टोनी आणि टिट्टो या धमाल जोडीची पुनर्रचना झाली आहे.

 

विजय कुमार अरोरा दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगणसोबत रवी किशन, संजय मिश्रा, मृणाल ठाकूर, नीरू बाजवा, चंकी पांडे, कुब्रा सैत, दीपक डोब्रियाल, विंदू दारा सिंग, रोशनी वालिया, शरत सक्सेना, साहिल मेहता आणि दिवंगत मुकुल देव यांसारखी तगडी स्टारकास्ट झळकणार आहे.

 

‘सन ऑफ सरदार २’ ची निर्मिती जिओ स्टुडिओज, देवगण फिल्म्स, ए देवगण फिल्म्स आणि एसओएस २ लिमिटेड यांनी केली आहे. निर्माते अजय देवगण आणि ज्योती देशपांडे यांनी या सीक्वलला भव्य रुपात सादर करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

व्हिडीओ पाहता, प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवणारी कॉमेडी, दमदार अॅाक्शन आणि पारंपरिक पंजाबी ठसका अनुभवायला मिळणार आहे. सोशल मीडियावर सध्या “#JassiPajiIsBack” हा हॅशटॅग ट्रेंड करत असून, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here