
ayurvedic hair pack for scalp health : केस गळण्याची समस्या ही सामान्य असली तर प्रदूषण, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, ताणतणाव आणि रासायनिक केसांच्या उत्पादनांमुळे केस कमकुवत होतात आणि तुटू लागतात. अशावेळी काही नैसर्गिक उपाय करणे जास्त गरजेचे आहे.
केसांसाठी काही घरगुती उपाय करायचे असतील तर मेथी दाणे हे फायदेशीर ठरतात. यामुळे केस गळणे कमी होते इतकेच नाही तर केस मजबूत आणि जाड देखील होतात. तसेच केस तुटण्यापासून रोखले जातात.
मेथीमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड असते, जे मुळांना पोषण देऊन केसांच्या वाढीस मदत करते. बुरशीविरोधी गुणधर्म असतात, जे टाळूचे संक्रमण आणि डोक्यातील कोंडा दूर करतात.
मेथी दाण्याचा हेअर पॅक तयार करण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी बारीक पेस्ट करुन ती टाळूला आणि केसांना लावा. ३० ते ४० मिनिटांनी सौम्य शाम्पूने केस धुवा.
केसांना मेथी दाण्याची पेस्ट आणि दही घालून हेअर मास्क तयार करा. तो टाळूवर आणि केसांना लावा. ३० मिनिटांनी केस धुवा. यात असणारे लॅक्टिक अॅसिड केसांना मऊ आणि चमकदार बनवते.
नारळाच्या तेलात मेथीचे दाणे गरम करुन केसांना या तेलाने मालिश करा. १ तासानंतर केस धूवा. यामुळे केसांना कंडिशनिंग मिळते.
मेथीच्या पावडर मध्ये मध मिसळून त्याची पेस्ट तयार करा. केसांना ही पेस्ट २० ते २५ मिनिटे लावा त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. आठवड्यातून १ ते २ वेळा हा उपाय केल्यास फरक जाणवेल.