
Use natural remedies for hair growth : तरुण वयात केसांच्या समस्या निर्माण होणे आता खूप सामान्य झाले आहे. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी लोकं महागडे तेल, सीरम आणि कॉस्मेटिकचा वापर करतात, ज्यामुळे कधीकधी केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर आजच्या या लेखात आपण जाणून घेऊया अशा 5 गोष्टींबद्दल ज्या प्राचीन काळापासून लोक केसांसाठी वापरत आहेत. ज्याचा केसांच्या वाढ आणि निरोगी होण्यास मदत होते.
केस मुळांपासून गळणे, केस कमकुवत होणे आणि मधूनच तुटणे, केसांची रेषा गळणे, केसांचे नुकसान होणे, डोक्यातील कोंडा अशा अनेक समस्या बदलत्या वातावरणात तसेच आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होत असतात. त्यामुळे या समस्यांना बहुतेक लोकांना तोंड द्याव्या लागत आहेत. प्रदूषण, सूर्यापासून केसांचे संरक्षण न करणे, अयोग्य आहारामुळे पोषक तत्वांचा अभाव, केसांची योग्य स्वच्छता न करणे, केमिकल प्रोडक्टचा अति वापर करणे ही यामागील कारणे आहेत. जर तुम्हालाही यापैकी एक किंवा अधिक केसांच्या समस्या असतील तर सर्वप्रथम तुम्ही तुमचा आहार सुधारला पाहिजे. त्याच वेळी केमिकन प्रोडक्टऐवजी, तुम्ही नैसर्गिक गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. या अशा पाच गोष्टींबद्दल जाणून घेऊ ज्या केसांसाठी खूप काळापासून वापरल्या जात आहेत. तसेच केसांची वाढ सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
सोशल मीडियावर अनेक हेअर केअर संबंधीत नवीन हॅक्स येत असतात आणि त्यातच यामध्ये तुम्ही इन्फ्लुएंसरना महागड्या प्रोडक्टची जाहिरात करताना पाहिले असेल. याच्या प्रभावाखाली लोकं हजारो रुपये खर्च करतात आणि त्यांच्या वापराने सुद्धा चांगले परिणाम मिळत नाहीत. वापरून पाहिलेले आणि चाचणी केलेले उपाय निकाल देतात आणि कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत.
आवळा खाण्याचे आणि केसांना लावण्याचे फायदे
आवळा केसांसाठी वरदानापेक्षा कमी मानला जात नाही. आवळा खाल्ल्याने केस मजबूत होतात आणि केसांची वाढ सुधारते, तर हा आवळा तुम्ही केसांना लावल्यास तुम्हाला अनेक फायदे देखील मिळतील, जसे की डोक्यातील कोंडा दूर होईल आणि केस गळणे कमी होईल, यासोबतच केस काळे होतील.
भृंगराज औषधी गुणांनी परिपूर्ण आहे
केसांसाठी भृंगराज तेल देखील बाजारात उपलब्ध आहे जे खूप फायदेशीर मानले जाते, परंतु बाजारात उपलब्ध असलेले तेल देखील भेसळयुक्त असू शकते. अशावेळेस तुम्ही ते एखाद्या विश्वासार्ह ब्रँडकडून खरेदी करावे किंवा तुम्ही या वनस्पतीची पानांचा रस तुमच्या केसांवर लावू शकता जे केस गळती कमी करण्यास आणि केसांची वाढ सुधारण्यास मदत करते.
केसांसाठी मेथीचे दाणे उपयुक्त
मेथीच्या दाण्यांचे तुमच्या केसांसाठीही आश्चर्यकारक फायदे आहेत. ते तुमच्या स्कॅल्पला स्वच्छ करेल आणि केस गळणे आणि तुटणे देखील कमी करेल. तसेच यांचा वापर तुमच्या केसांना मऊ बनवते. तर रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले मेथीच्या दाण्याचे पाणी केसांच्या मुळांवर लावता येते किंवा मेथीचे दाणे बारीक पेस्ट करून मुळांपासून टोकांपर्यंत लावावे. तसेच ही पेस्ट तुम्ही मेंदीमध्ये मिक्स करून देखील लावू शकता.
शिकाकाई-रीठा
आजकाल बहुतेक लोकं असे शाम्पू वापरण्यास सुरुवात केली आहे ज्यामध्ये अनेक कॅमिकल असतात. मात्र पूर्वी लोकं केस धुण्यासाठी शिकाकाई आणि रीठा वापरत असत. त्यात आवळा देखील वापरला जात असे. रीठा केसांमधील घाण काढून टाकतो, तर शिकाकाई आणि आवळा केस गळणे आणि कोंडा यासारख्या समस्यांपासून आराम देतात.
कांद्याचा रस लावा
कांद्याचा रस केसांसाठी देखील फायदेशीर आहे. यामुळे केस गळती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते आणि म्हणूनच केसांच्या काळजीच्या उत्पादनांमध्ये त्याचा वापर केला जात आहे. कांद्याचे तेलही बाजारात येऊ लागले आहे. तुम्ही ते थेट वापरू शकता. शाम्पू करण्यापूर्वी एक तास आधी कांद्याचा रस स्कॅल्पवर लावा आणि नंतर केस धुवा.
( डिस्क्लेमर : यामध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)