फेसबुकवरील क्रेडिट कार्डच्या आमिषातून वृद्धाची ६ लाखांची ऑनलाईन फसवणूक

0
0

माणदेश एक्स्प्रेस न्यूज|रत्नागिरी : चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त वृद्धाची तब्बल ६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रेडिट कार्ड देण्याचे आमिष दाखवून दोन अनोळखी व्यक्तींनी ही फसवणूक केली.

 

याबाबत विजय हरी बापट (वय ७२) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फेसबुकवरील ‘लाइफटाईम क्रेडिट कार्ड’ जाहिरातीवर विश्वास ठेवून त्यांनी त्यात स्वतःची वैयक्तिक माहिती भरली. त्यानंतर २० मार्च रोजी त्यांच्या मोबाईलवर दोन अनोळखी व्यक्तींचे कॉल आले आणि त्यांनी बँकेसंबंधित माहिती मागवली.

 

बापट यांनी क्रेडिट कार्ड मिळेल या आशेने आपले एटीएम कार्डचे तपशील व पिन नंबर दिला. काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून व मुदत ठेव खात्यातून मिळून तब्बल ६ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आले. फसवणूक लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधला. मात्र तोपर्यंत व्यवहार पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले.

 

या तक्रारीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत कलम ६६(४) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून फसवणूक करणाऱ्या दोघांचा शोध घेण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे.

 

त्यांनी याबाबत खात्री केली असता त्यांच्या बचत खाते व मुदत ठेवीतील एकूण ६ लाख रुपये ऑनलाइन काढून घेऊन घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिस स्थानकात मोबाइलवरून संभाषण करणाऱ्या दोन अनोळखी व्यक्तींविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here