पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा शनिवारी

0
68

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली व गुरुकुल शिक्षण संस्था, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” शनिवार, दिनांक 31 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे. हा रोजगार मेळावा, शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज-पंढरपूर रोड, मिरज येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त दत्तात्रय देवळे यांनी प्रसिध्दीपत्रकारव्दारे केले आहे.

 

या मेळाव्यात 2 हजार पेक्षा अधिक पदाकरीता जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील नामांकित अशा 22 पेक्षा जास्त कंपन्यांचा व स्वयंरोजगारासाठी कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महामंडळे यांचा सहभाग असणार आहे. दहावी, बारावी, आय. टी. आय, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट या प्रकारची शैक्षणिक पात्रता असणाऱ्या आणि सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी विविध पदांकरिता, मेळाव्यामध्ये उपस्थित उद्योजकांकडे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे आपला ऑनलाईन सहभाग नोंदवावा.

 

 

तसेच, शनिवार, दिनांक 31 मे 2025 रोजी, प्रत्यक्ष मुलाखतीस येताना, सर्व मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन छायांकित प्रती सोबत घेऊन याव्यात. रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली या कार्यालयाशी ०२३३-२९९०३८३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here