
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : येत्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात आयपीओ मोठ्या संख्येनं गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. आज पासून सुरु होत असलेल्या आठवड्यात शेअर बाजारात चार मेनबोर्ड आयपीओ आणि 5 एसएमई आयपीओ खुले होणार आहेत. या पैकी एजिस वोपॅक टर्मिनल्स, लीला हॉटेल्स, प्रोस्टारम इंफो, सिस्टम्स स्कोडा ट्यूब्स यांची माहिती जाणून घेणार आहोत.
एजिस वोपॅक टर्मिनल्स लिमिटेड 2800 कोटींच्या उभारणीसाठी आयपीओ आणत आहे. याचा किंमतपट्टा 223-235 रुपयांदरम्यान आहे. गुंतवणकदार यासाठी 28 मे पर्यंत बोली लावू शकतील. रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये 63 शेअर मिळतील. यासाठी त्यांना किमान 14805 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. शेअर अलॉटमेंट 29 मे रोजी केलं जाईल. त्यानंतर 2 जूनपासून ट्रेडिंग सुरु होईल. आयसीआयसीआय सिक्यूरिटीज आणि बीएनपी पारिबा याचा बुक रनर पार्टनर आहेत. जीएमपीवर एजिस वोपॅकचे शेअर 15 रुपयांच्या प्रीमियवर ट्रेड करत आहेत. जीएमपीनुसार या आयपीओचं लिस्टींग 250 रुपये प्रति शेअर होण्याची अपेक्षा आहे.
लीला हॉटेल्स ला ऑपरेट करणाऱ्या श्लॉस बंगळुरुचा आयपीओ 26 मेला खुला होणार आहे. आयपीओद्वारे 3500 कोटी रुपयांची उभारणी कंपनीकडून केली जाणार आहे. 2500 रुपयांचे नवे शेअर जारी केले जाणार आहेत. तर, 1000 कोटी रुपयांच्या शेअर्सची ऑफर फॉर सेल द्वारे विक्री केली जाईल. आयपीओचा किंमतपट्टा 413-435 रुपयांदरम्यान ठेवला आहे. लॉटसाठी बोली लावण्याची अंतिम तारीख 28 मे आहे. रिटेल गुंतवणूकदारांना 34 शेअर एका लॉटमध्ये मिळतील. यासाठी किमान 14790 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. लीला हॉटेल्सचा आयपीओ जीएमपीवर 455 रुपयांवर पोहोचला आहे. एका शेअरमागं गुंतवणूकदाराला 20 रुपयांचा फायदा होऊ शकतो.
पॉवर सोल्यूशन्स आणि एनर्जी स्टोरेज कंपनी प्रोस्टारम इन्फो सिस्टीम्सकडू 168 कोटींच्या उभारणीसाठी आयपीओ आणला जाणार आहे. याद्वारे 1.60 कोटी नवे शेअर जारी केले जातील. आयपीओचा किंमतपट्टा 95-105 रुपयांदरम्यान आहे. हा आयपीओ 27 मे रोजी खुला होईल तर 29 मे ला बंद होणार आहे. एनएसई आणि बीएसईवर याचं लिस्टींग 3 जूनला होईल. जीएमपीवर या आयपीओला फारसा प्रतिसाद दिसत नाही.
स्कोडा ट्यूब्स ही कंपनी स्टेनलेस स्टील पाईप बनवते, ही कंपनी आयपीओ घेऊन येणार आहे. हा आयपीओ 220.50 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला जात आहे. किंमतपट्टा 130 ते 140 रुपयांदरम्यान आहे. 28 ते 30 मे दरम्यान बोली लावता येईल तर लिस्टींग 4 जूनला होणार आहे.
(टीप- तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)