सांगलीत MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; तीन तरुणांना अटक

0
919

माणदेश एक्सप्रेस न्युज|सांगली – शहरातल्या एका वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या MBBSच्या विद्यार्थिनीवर तिघा तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून, त्यांना २७ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता सांगलीतील एका नामांकित महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. तिची ओळख कॉलेजमधील दोन विद्यार्थ्यांशी झाली होती. त्यांनी तिला सिनेमाला नेण्याचे आमिष दाखवून वान्लेसवाडी येथे एका फ्लॅटवर नेले. तेथे तिला कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात पुणे, सोलापूर आणि सांगली येथील युवकांचा सहभाग आहे.

 

 

पीडितेला शुद्धीवर आल्यानंतर ती थेट विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोहचली आणि घटनेची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही तासांत तिघांनाही अटक केली. आरोपींच्या विरोधात बलात्कार, गुंगीचे औषध देणे, धमकी देणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या घटनेने संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारानंतर घाबरून न जाता पीडित विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजमाध्यमांवर तिच्या साहसाची प्रशंसा केली जात आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here