महत्वाची बातमी! पहा लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल किती वाजता पाहता येणार?

0
9

लोकसभा निवडणूक 2024 चे मतदान आता अखेरच्या टप्प्यात आले असून 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मदान पार पडेल. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच म्हणजे 4 जून रोजी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होईल. देशात कोणाचं सरकार येणार, पंतप्रधान मोदी विजयाची हॅटट्रिक करणार की इंडिया आघाडी त्यांना रोखू शकेल ? असे अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात असून त्या सर्वांची उत्तर4 तारखेला मिळतील. जसजसा निवडणूक निकालाचा दिवस जवळ येऊ लागला आहे, तसतशी सर्वांचीच उत्सुकता वाढू लागली आहे. देशातील महत्वपूर्ण लढतींप्रमाणेच महाराष्ट्रतही बारामतीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पवार वि. पवार हा सामना सुप्रिया सुळे जिंकतात की सुनेत्रा पवार पहिल्याच निवडणुकीत बाजी मारतात ? याचीही सर्वांनाच उत्सुकता आहे.

पुढल्या आठवड्यात, मंगळवारी 4 जूनला मतमोजणी होणार असून त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. मतमोजणी नेमकी कधी सुरू होणार आणि निवडणूकीचा पहिला कौल कधी येणार, असा प्रश्न्ही अनेकांना पडला असून नागपूरमधील डॅा. विपीन ईटनकर, ( निवडणुक निर्णय अधिकारी) यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

पहिला कौल कधी येणार ?

लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल नऊ वाजता येणार आहे. सकाळी ८ वाजता पोस्टल बॅलेटची मतमोजणी होईल, त्यानंतर 8.30 ला ईव्हीए, पहिला राऊंडचा निकाल सकाळी नऊला जाहिर होईल, असेन डॅा. विपीन ईटनकर यांनी नमूद केलं. दरम्यान नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीच्या एक दिवस आधी, सोमवारी 3 जूनला रंगीत तालीम होणार आहे.

मतमोजणीसाठी जय्यत तयारी

मतमोजणीसाठी तयारी पूर्ण झाली असून मतमोजणी केंद्रात कुणालाही मोबाईल घेऊन प्रवेश मिळणार नाही. मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन स्तरीय सुरक्षा असेल, तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात जल्लोष करता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूरातील एपीएमसी कळमना येथे नागपूर आणि रामटेक मतदारसंघातील मतमोजणी होणार आहे. दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 12 खोल्या देण्यात आल्या असून प्रत्येक खोलीत 20 टेबल्स मांडण्यात येतील. “एका राऊंडला 120 ईव्हीएमची मोजणी होणार, 17 ते 18 राऊंडमध्ये मतमोजणी होणार असे त्यांनी सांगितले. मतमोजणी एजंटची नोंदणी पूर्ण झाली आहे, दोन ते तीन हजार पोलिंग एजंट मतमोजणी केंद्रावर असणा, असेही नमूद करण्यात आले.