
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी, ता. १८ (प्रतिनिधी): भारतीय सैन्याने अलीकडेच यशस्वीपणे पार पाडलेल्या “ऑपरेशन सिंदूर” (Operation Sindoor) या कारवाईनंतर संपूर्ण देशभरातून भारतीय सेनेच्या कार्याची स्तुती होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यातील जनतेच्या वतीने, भारतीय सेनेच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही रॅली आज संध्याकाळी ५ वाजता आटपाडी एस.टी. स्टॅन्ड येथून सुरुवात होणार असून, शहरातून फेरी मारून नागरिकांमध्ये देशभक्तीची जाणीव निर्माण केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) तसेच समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर (Brmhanand Padalkar) हे करणार आहेत.
तालुक्यातील सर्व देशभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीय सेनेच्या शौर्याला मानवंदना द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
रॅलीदरम्यान देशभक्तिपर गीतांची धून, हातात तिरंगा धारण केलेले युवक आणि देशसेनेबद्दलचा अभिमान असलेली जनतेची उपस्थिती या सर्व घटकांनी आटपाडीतील वातावरण देशभक्तीमय होणार आहे. तरी या रॅलीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आटपाडी तालुका भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.