VIDEO:मुलानं मदर्स डेनिमित्त आईवर लिहिला खतरनाक निबंध; निबंध वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल

0
420

Viral funny video: आई प्रत्येक मुलासाठी खूप खास असते. आई आणि मुलाचे नाते हे जगातील सर्वात पवित्र नाते मानले जाते. हे एकमेव नाते आहे जे सर्व नात्यांमध्ये वरचे आहे. कधीकधी मुले त्यांच्या आईच्या भावनाही दुखावतात. पण आई नेहमीच तिच्या मुलांचा विचार करते. तर कधीकधी हीच आई मुलांना शिस्त लावण्यासाठी कठोरही होते. आई आणि मुलामधील अशाच एका गमतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच मदर्स डे झाला, याच निमित्ताने एका मुलानं आपल्या आईसाठी निबंध लिहला. जे वाचल्यानंतर आई इतरी शॉक झाली की तिनं मुलाला चांगलंच बदडलं आहे. हा निबंध वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

 

व्हिडिओमध्ये, आई मुलाचे कान ओढताना दिसत आहे कारण त्याने मदर्स डे साठी आईवर असा निबंध लिहिला होता, की वाचून आईला राग अनावर झाला. असं काय लिहलंय या मुलानं जाणून घेऊयात. व्हिडिओमध्ये, आई मुलाने लिहिलेला निबंध वाचताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मुलगा शाळेतून उशिरा परतताना दिसत आहे. ही आई विचारते की तुला उशीर का झाला. यावर हा मुलगा निबंधाबद्दल माहिती देते,हे ऐकून आई आनंदी होते. ती म्हणते की तिला निबंधही वाचायचा आहे. मात्र निबंध वाचल्यानंतर मात्र तिला चांगलाच धक्का बसला आहे.

 

 

आता तुम्ही म्हणाल या मुलानं असं लिहलंय तरी काय? तर या मुलानं, निबंधामध्ये सुरुवातीला,”माझ्या आईसारखं कुणीच नाही. इतरांची आई माणूस असते, पण माझ्या आईची अनेक रूपं आहेत. माझे पप्पा म्हणतात, आई नागिण आहे, आजी म्हणते, माझी मुलगी गाय आहे, आजोबा म्हणतात, मांजरीसारखी स्वार्थी आहे. पप्पांची आई म्हणते, पोपटासारखी बोलते. पण मला माझी आई वाघिण वाटते. फोन वापरल्यावर मला ओरडते, पण स्वत: तासंतास सोशल मीडियावर बसलेली असते. इतरांची आई मुलांना मारहाण करते, पण माझ्या आईचे डोळेच एखाद्याला घाबरवण्यासाठी पुरेसे आहेत. आई सांगते, खोटं बोलू नकोस पण स्वत: वडिलांशी नेहमी खोटं बोलते. आत्त्यानं दिलेले पैसे माझ्याकडून हिसकावून घेते आणि मग कुठले पैसे? असा प्रश्न करते.”

 

 

व्हिडिओचा कमेंट सेक्शन नेटकऱ्यांच्या मजेदार कमेंट्सनी भरलेला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “मुलाची बुद्धीमत्ता पाहा किती चांगले विश्लेषण आहे.”दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “बरं, हा निबंध प्रत्येक आईला शोभतो.” तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “मुलाने आईबद्दल संपूर्ण कुटुंबाचे विचार प्रकट केले.” दरम्यान, दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले की, “मुलाचा अभिनय खूप चांगला आहे.”

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here