सर्वोच्च न्यायालयाने बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल बदलला

0
329

माणदेश एक्सप्रेस न्युज : मुंबई : बदलापूर विद्यार्थ्याच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या कथिक एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला एसआयटी स्थापन करण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने बदलला आहे. या प्रकरणात आता डीजीपी यांच्या देखरेखेखाली समिती नेमण्यात येणार आहे. बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आधी सह पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले होते.

 

बदलापूर येथील एका शाळेतील दोन लहान विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण प्रकरणातील सफाई कामगार आरोपी अक्षय शिंदे याला तळोजा जेलमधून कल्याण येथे आणताना २३ सप्टेंबर २०२४ रोजी कथित एन्काऊंटर झाले होते. या प्रकरणात अक्षय शिंदे याच्या पालकांनी नुकसान भरपाईसाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.

 

मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित एन्काऊंटर प्रकरणात गुंतलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर ३ मे पर्यंत केस दाखल करण्याचे आदेश ७ एप्रिल रोजी दिले होते. यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

सरकारने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा हवाला देत या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे हस्तांतरित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाअतिरिक्त वेळ मागितला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. त्यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेशाचे पालन न केल्याबद्दल अवमानाच्या कारवाईचा इशारा दिला आणि एसआयटीला गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते.

 

राज्य सरकारने सुरुवातीला तक्रारदार नसल्याचा दावा केला, परंतु अखेर न्यायालयाने ३ मे पर्यंत अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील गुंतललेल्या पाच पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश एसटीआयटीला दिले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here