मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट मिसमॅच; दीनानाथ रुग्णालयावर योग्य ती कारवाई नाही – सुप्रिया सुळे

0
101

माणदेश एक्सप्रेस /पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट केलं होतं. माझ्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होत्या की, महाराष्ट्राच्या लेकीला न्याय देतील. मात्र, पहिल्या दिवशी त्यांनी जे स्टेटमेंट केलं आणि आज त्यांचं जे स्टेटमेंट आहे, यात मिस मॅच आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात अद्याप योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत आम्ही कोर्टात देखील धाव घेत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप संबंधित डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही. हा दोषींना वाचवण्याचा प्रयत्न आहे का? गुन्हा उशिरा का होईना दाखल झाला, त्याचे मी स्वागत करते. महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर अन्याय होणार नाही, हीच आमची भूमिका आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत आम्ही कोर्टातदेखील धाव घेत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप न्यायालयात जाणार आहेत. एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना निर्दोष ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडून चार अहवाल तयार करण्यात आले आहेत. मात्र, या अहवालामध्ये अडकण्यापेक्षा सत्य जे आहे, त्याच्यावर फोकस राहणं आवश्यक आहे. कुठला अहवाल काय म्हणतो, यात अडकायला नको, असंदेखील सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

 

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here