आटपाडी तालुका भाजप अध्यक्षपदी ‘यांची’ निवड

0
2551
फोटो : आटपाडी : भाजपच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दादासाहेब हुबाले यांचा सत्कार करताना ब्रम्हानंद पडळकर, विनायककाका पाटील व उपस्थित मान्यवर

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी (ता. २० एप्रिल) : भारतीय जनता पक्षाच्या आटपाडी तालुका अध्यक्षपदी निवडीसाठी आज आटपाडी येथील शासकीय विश्रामगृह येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार व संघटनात्मक बांधणी लक्षात घेऊन दादासाहेब हुबाले यांची आटपाडी तालुकाध्यक्ष निवड करण्यात आली.

हुबाले यांची निवड एकमताने झाली असून तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घकाळापासून पक्षासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या दादासाहेब हुबाले यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर व मा. सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी दाखवलेला विश्वास लक्षणीय मानला जात आहे.

आटपाडी येथील शासकीय विश्रामगृह येथे नव्या तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या उपस्थित निवडी संपन्न झाल्या. तालुकाध्यक्षपदासाठी जयवंत सरगर, दादासाहेब हुबाले, महादेव पाटील, प्रणव गुरव यांची नावे आघाडीवर होती. यावेळी सर्वानुमते ब्रम्हानंद पडळकर यांनी दादासाहेब हुबाले यांचे नाव तालुकाध्यक्षपदासाठी जाहीर केले.

यावेळी जयवंत सरगर, युवा नेते विनायककाका पाटील, चंद्रकांत दौंडे, विष्णू अर्जुन पै. अजित जाधव, मा. उपसरपंच सागर चवरे, दादासाहेब मोटे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर हुबाले यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानत, पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. “पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सक्रियपणे आवाज उठवणे, हेच माझे मुख्य ध्येय राहील,” असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह अनेक वरिष्ठ नेत्यांनी हुबाले यांचे अभिनंदन करत आगामी काळात त्यांच्याकडून उत्कृष्ट नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here