
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : युवा मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी युवा मोर्चा व भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर राजीनामा पत्र टाकत, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.
समाज माध्यमांवर राजीनामा पत्र शेअर करत वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे पाटील अनिल यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीपासून अनिल पाटील यांना पडळकर गटाकडून दुर्लक्ष करण्यात आले होते. करगणीच्या सभेनंतर पडळकर गटापासून अनिल पाटील यांचा दुरावा वाढतच राहिला होता.
आटपाडीतील आमदार पडळकर यांच्या नागरी सत्कार सोहळ्यातही सहभागी नव्हते. त्यांनी एका कार्यक्रमात निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे जाहीर केले. आटपाडी येथे झालेल्या जिमच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले होते.