बेल फळाचा रस कधी प्यायला आहे का? जाणून घ्या फायदे

0
207

Helth Tips : उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही करणाऱ्या गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या थंड पेयांचं सेवन करतात. यातील एक सर्वात फायद्याचा रस म्हणजे बेल फळाचा रस. बेलाच्या रसाचे उन्हाळ्यात अनेक फायदे होतात. बेलाचा वापर आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच तुमचं सौंदर्य चांगलं ठेवण्यासाठीही होऊ शकतो. आयुर्वेदातही बेलाचे गुण सांगण्यात आले आहेत.

 

बेल फळाचा रस तुमच्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. उन्हाळ्यात दररोज बेल फळाचा रस घेतल्यास याचा फायदा काही दिवसांतच बघायला मिळेल. बेल फळात प्रोटीन, थायमीन, रायबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन-सीसारखे आणखीही काही पोषक तत्वे आढळतात. बेलफळ हे एक आरोग्यवर्धक फळ आहे, जे पचन सुधारण्यास, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि विविध आरोग्य समस्यांवर उपचार करण्यास मदत करते.

 

बेलफळाचे आरोग्यदायी फायदे

बेलफळात फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात आणि आतड्याची कार्यक्षमता वाढवतात.

बेलफळात जीवनसत्वे अ, ब आणि क असतात, जी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहेत.

बेलच्या साली आणि फांद्यांमध्ये असलेला फेरोनिया गम नावाचा घटक मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.
रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.

बेल त्वचेवरील डाग, सुरकुत्या आणि अन्य समस्या कमी करण्यास मदत करते. तसेच केशगळणे कमी करते.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here