
शाळा स्थापनेपासून विद्यार्थी कार्यक्रमाला हजर
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा पांढरेवाडी या शाळेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने, शाळेचा अमृतमहोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
७५ व्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त शाळेचे सहशिक्षक प्रमोद देठे यांनी एक सुंदर असा अमृत महोत्सवी शाळेचा लोगो तयार केला होता, त्या लोगोचे अनावरण प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ कोळपे व १९५१ चे इयत्ता १ ली चे विद्यार्थी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे विशेष बाब म्हणजे १ एप्रिल १९५१ मध्ये शाळेत जे इयत्ता पहिलीला विद्यार्थी होते त्यांच्या उपस्थित हा सोहळा साजरा करण्यात आला. शाळेतील पहिला विद्यार्थी निवृत्ती जाधव, जगन्नाथ चव्हाण, आटपाडी गावचे माजी सरपंच शिवाजीतात्या पाटील, नवनाथ जाधव, मारुती चव्हाण, बाबुराव जाधव हे विद्यार्थी इयत्ता पहिलीला १९५१ मधील विद्यार्थी उपस्थिती होते. या सर्वांना शाळेतर्फे गौरव करण्यात आला. तसेच सन २०२५-२६ मध्ये इयत्ता पहिलीला जी मुले दाखल होणार आहेत त्या सर्व मुलांना शालेय साहित्य भेट देण्यात आले.
औंध संस्थानचे राजे यांनी स्थापन केलेली ही शाळा झोपडीतून कौवलात आली. कौवलातून ती स्लॅब मध्ये आणि स्लॅप मधून आज डबल मजली इमारत मध्ये भरत आहे. शाळेच्या प्रगतीचा आलेख शाळेचे मुख्याध्यापक अजय राक्षे घेतला. तसेच अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त या शाळेत जे पूर्वी ज्ञानदानाचे काम करत असणारे जे शिक्षक होते त्यांनाही आवर्जून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांचाही सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये जगन्नाथ जाधव, सुधीर लाटणे, जयश्री पाटील, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमास प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन उत्तम जाधव, श्रीकांत कुंभार, बाळासो साळुंखे, प्रसाद देशपांडे, अंकुश माळी, रूपाली चांडवले, प्राची पाटील, समाधान पवार, शंकर चव्हाण, अमोल पाटील, दीपक कुंभार, संजय कबीर, दिनेश माने, अमोल कोठीवाले, सुभाष सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य, माता-पालक संघ सर्व सदस्य, महिला पालक, पांढरेवाडी पाटील मळा, जाधव मळा, अनुसेमळा, काळी खडी, कोळेकर मळा या वस्तीवरील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी. शाळेच्या शिक्षिका रेखा सूर्यवंशी, श्रीमती विद्या कोपर्डे, ॲलेक्स डल्यु सर, सारिका चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आभार प्रमोद देठे यांनी मानले.