आटपाडीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रकार

0
1303

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील गवळी गल्ली येथे राहणाऱ्या महिलेच गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयन्त झाला. याप्रकरणी आरोपीवर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत फिर्यादी सुजाता तानाजी गवळी रा. गवळी गल्ली यांनी दिलेली फिर्यादीनुसार त्या व त्यांचे गल्लीतील वंदना पोतदार व नंदा काशीद असे गवळी गल्ली आटपाडी येथे शतपावली करून नंदा काशीद यांचे घरासमोर गप्पा मारत बसल्या होत्या.
यावेळी आरोपी रोहित सुतार रा. सुतारगल्ली आटपाडी याने फिर्यादीचे पाठीमागून येऊन फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून तोडण्याचा प्रयत्न केला आहे.

 

 

सदरची घटना हि दिनांक ०८ रोजी घडली असून, आरोपी रोहित सुतार याच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल असून, पोलीस अधिक तपात करत आहेत. सदरील घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here