
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथे शेतजमिनीच्या झालेल्या वादातून आटपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती अशोक धोंडीराम माळी यांनी एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी घडली आहे. याबाबत पिडीत महिलेने आटपाडी पोलिसात तक्रार दिली आहे.
तक्रारीमध्ये म्हटले आहे की, आमची दोन वर्षापुर्वी ७० गुंठे जमीन पतीला फसवुन कुमार काशिनाथ माळी यांच्या इतर सात लोकांनी स्व:ताचे नावावर करुन घेतली आहे. याबाबत न्यायालयात दावा सुरु आहे.
शनिवारी दुपारी न्यायालयात दावा दाखल केलेल्या जमीनीत अशोक धोंडीराम माळी, वैभव काशिनाथ माळी, कुमार काशिनाथ माळी सर्व रा. सिद्धनाथ चित्र मंदिर जवळ, आटपाडी हे ट्रॅक्टर घेवुन जमीन सपाट करु लागले होते. यावेळी मी व माझा मुलगा त्यांना थांबवत असताना त्या तिघांनी मिळुन माझ्या मुलास खाली पाडुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तुला जिवंत ठेवत नाही.
यावेळी माझे मुलाला त्यांचे तावडीतुन सोडविणेस गेली असता अशोक धोंडीराम माळी यांने मला तु माझी अब्रू घालवलीस का? आता मी तुझी अब्रु घेतो असे म्हणुन मला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असून शिवीगाळी केली आहे.