सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांचा आत्महत्येचा प्रयत्न

0
428

माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. राहत्या घरात पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांचावर सांगलीच्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून, पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पाटील यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळं जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

 

सांगली महापालिकेचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सुरेश पाटील यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुटुंबातील व्यक्तींना सदर बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांना तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांनी हे पाऊल कोणत्या कारणातून उचललं,हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची नोंद झाली असून, अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.

 

 

सुरेश पाटील हे सांगली महापालिकेचे 2000 साली महापौर म्हणून कार्यरत होते. त्यामुळं त्यांना मिलेनियर महापौर म्हणून देखील ओळखलं जातं. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुरेश पाटील नेहमीच अग्रेसर असतात. नगरसेवक ते महापौर आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. जयंत पाटील यांचे ते कट्टर समर्थक म्हणून देखील ओळखले जायचे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2014 मध्ये त्यांनी सांगली विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती. नुकतंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here