शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिक्षक संघाचा शिलेदार बिनविरोध : असिफ मुजावर

0
252

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील प्राथमिक शिक्षकांच्या पतसंस्थेत नाट्यमय घडामोडीनंतर चर्चेत असणाऱ्या आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी शिक्षक संघाचा शिलेदार बिनविरोध निवडून आला. चेअरमनपदी निंबवडेचे सुपुत्र व संघटनेचे तालुका उपाध्यक्ष रावसाहेब देवडकर यांची बिनविरोध झाल्याने शिक्षक संघाने फटाके फोडत आनंद व्यक्त केला.

 

यावेळी बोलताना शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष असिफ मुजावर म्हणाले, आटपाडी तालुक्यांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तालुका स्तरावर समविचारी शिक्षकांनी एकत्र येऊन आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची पतसंस्था उभा केली. परंतु पुढे विविध संघटनेमध्ये आणि शिक्षक बँकेच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या लोकांनी या पतसंस्थेमध्ये निवडणूक लावून ही संस्था निवडणूक प्रतिष्ठेची केली.

 

 

किरण सोहनी यांनी चेअरमन पदाचा स्वखुशीने राजीनामा दिल्यानंतर चेअरमन निवडीसाठी प्रक्रिया सुरू झाली. आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघाकडे पाच आणि सत्ताधारी पॅनलकडे सहा संचालक इतके बहुमत होते. बहुमत असल्यामुळे सत्ताधारी गटामध्ये अनेकजण पॅनल प्रमुखांना डावलत चेअरमन पदासाठी अडून बसले होते.

 

तर दुसरीकडे शिक्षक संघ मात्र एकाच नावावरती ठाम होता. पराभव झाला तरी सत्तेच्या विरोधात बसण्याची हिंमत शिक्षक संघाने अखेरपर्यंत दाखवली. अखेरच्या दिवशी बहुमत असणारी सत्ताधारी पॅनलप्रमुखांनी हतबल होऊन आपल्या सहा मधील सवंगड्यांना डावलत शिक्षक संघाचे तालुका उपाध्यक्ष रावसाहेब देवडकर यांना चेअरमन पदी विराजमान केले. यामध्ये निंबवडे गावामध्ये कार्यरत असणारे शिक्षक संघाचे ज्येष्ठ शिलेदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

शेवटच्या क्षणी तरुण आणि मितभाषी संघ शिलेदाराने मारलेल्या स्ट्रोक मध्ये सत्ताधारी पॅनेलला घायाळ करत स्वतः सत्तेवरती बिनविरोध विराजमान होण्याचा बहुमान मिळवला. ‘शिक्षक संघाच्या एका उमेदवाराला चेअरमन होऊ न देण्याच्या’ भूमिकेने प्रभावीत झालेल्या सत्ताधाऱ्यांना बहुमत असून सुद्धा, विरोधी पॅनल मधील उमेदवाराला चेअरमन करण्याची नामुष्की पत्करावी लागली. सत्ताधारी पॅनल कडून आपल्याच संघ शिलेदाराचे नाव घोषित झाल्यामुळे, आपल्याकडे अल्पमत असून आपल्या संघाचा चेअरमन होत आहे. यामुळे शिक्षक संघाने निवडणुकीत अर्ज न भरता आपल्या शिलेदाराला बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. चेअरमन निवडणूक समन्वयाने आणि बिनविरोध झाल्यामुळे सर्वांमध्ये आनंदी आनंद झाला. पण चेअरमन पदासाठी कार्यरत असणाऱ्या शक्तिना मात्र आपल्या चेहऱ्यावरचे सुख घेता आले नाही अन दुःख लपवता आले नाही. रावसाहेब देवडकर यांच्या चेअरमन निवडीनंतर शिक्षक संघाने जल्लोष साजरा केला.

 

 

आजपर्यंत कधीही तत्वाशी व नात्यांशी तडजोड करून, आपणास एखादं पद मिळावे,ही भावना कधीच ठेवली नाही. सत्तेच्या संघर्षात ज्या भावनेने सुरवातीस मला चेअरमन केले, ती भावना काही जणांच्या अतिमहत्वकांक्षेने दूर जाते आणि यामध्ये नेत्यांची तारांबळ उडते हे लक्षात घेता आपण यातून लांब व्हावं असं वाटलं. परंतु आपल्या अशा वागण्याने एका निष्ठावंत संघ शिलेदारालाच चेअरमन पदाची संधी मिळाली याचा आनंद काही वेगळाच आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here