
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील दिघंची येथील इंद्रभाग्य शैक्षणिक संकुलात इंद्रभाग्य आदर्श प्राथमिक विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सरस्वती दयानंद मोरे यांना पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय महिला गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सरस्वती मोरे अनेक दिवसापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या कार्यरत आहेत. तसेच त्या शिक्षिका असून दिघंची येथील इंद्रभाग्य शैक्षणिक संकुलात अध्यापनाचे कार्य करत असून, त्या कवी, लेखिका आहेत. त्यांनी साहित्यिक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना स्वप्नल फाउंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह व मेडल देवून गौरविण्यात आले.